Bangladesh मधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ६५० लोकांत सर्वाधिक हिंदू; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

239
Bangladesh मधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ६५० लोकांत सर्वाधिक हिंदू; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
Bangladesh मधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ६५० लोकांत सर्वाधिक हिंदू; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

बांगलादेशातील (Bangladesh) हिंदुविरोधी हिंसाचारावर संयुक्त राष्ट्रांनी भाष्य केले आहे. संयुक्त राष्ट्रांतील (United Nations) मानवाधिकारांच्या उच्चायुक्तांच्या अहवालात यावर भाष्य करण्यात आले आहे; परंतु हिंदूंवर आक्रमण करणारे कट्टर मुसलमान असल्याचा उल्लेख टाळण्यात आला आहे, असे वृत्त ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या अहवालानुसार १६ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत बांगलादेशातील हिंसाचारात ४०० लोकांचा बळी गेला, तर ५ आणि ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या हिंसाचारात २५० हून अधिक लोक मारले गेले. शेकडो लोक घायाळ झाले आहेत. शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election डिसेंबरमध्ये ?; नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता)

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात काय आहे अभ्यास ?
  • १६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालवधीत विद्यार्थी आणि तरुण यांच्या आंदोलनानंतर उसळलेल्या हिंसाचारात ६५० हून अधिक लोकांचा बळी गेला. मृतांमध्ये अल्पसंख्यांक हिंदू सर्वाधिक आहेत.
  • देशभरातील सर्वच रुग्णालये रुग्णांनी भरली असून रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नाही.
  • अधिकार्‍यांनी रुग्णालयांना माहिती देण्यापसून रोखल्यामुळे मृतांची नेमकी संख्या समजू शकलेली नाही.
  • संरक्षण दलांनी बळाचा अधिक वापर केला.

हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी; वोल्कर तुर्क यांची मागणी

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकारांचे उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, हिंसाचार करणारे, या हिंसाचारास कारणीभूत असलेले आणि ज्यांच्या दायित्वशून्यतेमुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला, अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास व्हायला हवा. आमचे एक पथक बांगलादेशाला जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. हे पथक हिंसाचाराच्या घटनांचा तपास करेल. (Bangladesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.