… तर कारसेवा पुन्हा करू; MLA Nitesh Rane यांचा हल्लाबोल

138
... तर कारसेवा पुन्हा करू; MLA Nitesh Rane यांचा हल्लाबोल
... तर कारसेवा पुन्हा करू; MLA Nitesh Rane यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात लव आणि लॅन्ड जिहाद माध्यमातून हिंदूंची संख्या कमी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. देशात शरिया कायदा लागू करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान देखील यांना मान्य नाही. स्वतंत्र वक्फ बोर्ड पाहिजे. वेगळे बोर्ड पाहिजे. प्रशासनाने यांचे लाड बंद करावेत, असे हल्लाबोल भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. आमदार नीतेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात (Hindu Janakrosh Morcha) आक्रमक भूमिका घेतली.

(हेही वाचा – Senior Section Engineer Railway Salary : रेल्वेतील विभागीय अभियंता काय काम करतो, त्याचा पगार किती?)

हा शेवटचा मोर्चा !

नीतेश राणे पुढे म्हणाले की, देशात पहिले हिंदूंचे हित पाहिले जाईल. धार्मिक स्थळांभोवती अतिक्रमण खपवून घेणार नाही. प्रशासनाने यांचे लाड बंद करावेत. कायदा-सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. प्रशासनाकडून जमत नसेल, तर यांचा कार्यक्रम करा. तुम्हाला काहीही होणार नाही, याची शाश्वती आपण देतो. संत सदगुरु गोदड महाराज ज्या ठिकाणी बसून कीर्तन करीत होते. त्या ठिकाणी अतिक्रमण करायचे. आणि आपण ते बघत बसायचे का? सिद्धटेक येथे अतिक्रमण होत आहे. आता हे खपवून घेणार नाही. प्रशासनाने अनधिकृत अतिक्रमणे काढावीत. न काढल्यास परत-परत मोर्चा काढण्यास मी देखील मोकळा नाही. हा शेवटचा मोर्चा ! आयोध्येत जशी कारसेवा करण्यात आली. तशीच कारसेवा पुन्हा करू.

मराठा आंदोलकांनी इंदापूरमध्ये केला विरोध

काही दिवसांपूर्वी नीतेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी पोलिसांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, काही पोलिसांकडून हिंदूंना डावलले जात असल्याचे सांगत नीतेश राणेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. सध्या हिंदू जनआक्रोश यात्रेच्या माध्यमातून ते दौरा करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत १८ ऑगस्ट रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मात्र, त्यांच्या यात्रेला विरोध करत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत असलेल्या आंदोलकांना अटक केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.