-
ऋजुता लुकतुके
५० किलो वजनी गटात ऑलिम्पिक पदक हुकल्यानंतर विनेश फोगाट शनिवारी नवी दिल्लीत आणि रविवारी आपलं मूळ गाव बिलालीला पोहोचली. साक्षी मलिक (Sakshi Malik), बजरंग पुनिया (Bajrang Punia) या तिच्या साथीदारांनी तिची जंगी मिरवणूक दिल्ली इथं काढली होती. पण, भोवती जल्लोष सुरू असताना विनेशचे डोळे मात्र पाणावलेलेच होते. अर्थातच, कारण होतं १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे हुकलेल्या पदकाचं. अलीकडेच तिचं अपीलही क्रीडा लवादाने फेटाळलं. पदक हुकल्यानंतर विनेशने आंतरराष्ट्रीय स्तरावर निवृत्तीही जाहीर केली. (Vinesh Phogat)
(हेही वाचा- Nashik मध्ये दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत; ATS ची कारवाई)
आताही नवी दिल्लीत तिला हार घालण्यात आला आणि तिची मिरवणूक निघाली तेव्हा पीटीआयशी बोलताना तिने एकच भावना व्यक्त केली. ‘ऑलिम्पिक पदक न मिळणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी जखम असेल. ती कधी भरून निघेल ते मला माहीत नाही. मला सावरायला किती वेळ लागेल हे आताच मी सांगू शकणार नाही. पण, आज ज्याप्रकारे माझं स्वागत झालं, ते पाहून मला नवीन ऊर्जा नक्की मिळाली आहे. आता ती ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरेन असं मला वाटतं,’ असं विनेश पीटीआयशी बोलताना म्हणाली. (Vinesh Phogat)
जो ‘प्यार और सम्मान’ मिल रहा है, वह ‘1000 गोल्ड मेडल’ से भी बड़ा है,मेरी बहन विनेश फोगाट !!
मेरी बहन के गाँव में जाकर बधाई दी!!#वेलकम_विनेश #VineshPhogat pic.twitter.com/uBPhtT00vh— Harsh Chhikara (@imharshchhikara) August 18, 2024
विनेशने आतापर्यंतच्या कारकीर्दीत तीन राष्ट्रकूल सुवर्ण, एक आशियाई सुवर्ण आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तीन कांस्य पदक कमावली आहेत. नवी दिल्लीहून तिचं मूळ गाव बिलाली इथं तिची मिरवणूक निघाली तेव्हा वाटेत जवळ जवळ प्रत्येक खाप पंचायतीने तिचं स्वागत केलं. या स्वागतामुळे विनेश भारावली होती. ‘ऑलिम्पिकने मला सुवर्ण पदक दिलं नाही. पण, तुम्ही लोकांनी ते दिलंत. मला आता शंभर सुवर्ण पदकं मिळाली आहेत,’ असं विनेशने यावेळी बोलून दाखवलं. (Vinesh Phogat)
VIDEO | “Although they didn’t give me the Gold medal, people here have given me that. The love and the respect that I have received is more than 1,000 Gold medals,” says wrestler Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) in Haryana’s Badli. #ParisOlympics2024
(Full video available on PTI… pic.twitter.com/mBfznGwb9Q
— Press Trust of India (@PTI_News) August 17, 2024
नवी दिल्ली ते बिलाली अशी विनेशची १२० किलोमीटरची मिरवणूक काढण्यात आली. आणि याचं आयोजन हरयाणातील खाप पंचायतने केलं होतं. हरयाणाकडून दोन जण ऑलिम्पिक खेळले आणि पदक जिंकले आहेत. पण, त्याचं झालं नाही, इतकं जोरदार स्वागत विनेशचं झालं. याबद्दल सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. तिला सोन्याची गदाही प्रदान करण्यात आली. (Vinesh Phogat)
(हेही वाचा- Senior Section Engineer Railway Salary : रेल्वेतील विभागीय अभियंता काय काम करतो, त्याचा पगार किती?)
दिवसभराच्या प्रवासानंतर दमलेल्या विनेशने तरीही उगवत्या कुस्तीपटूंसमोर भाषण केलं. आणि यात तिचे विक्रम मोडणारी आणि तिच्यापुढे जाणारी महिला कुस्तीपटू बिलालीतच जन्माला यावी, असं तिने बोलून दाखवलं. आदी निवृत्ती जाहीर केली असली, तरी कारकीर्दीचं पुढे काय करायचं हे आता शांतपणे ठरवू असंही तिने बोलून दाखवलं आहे. (Vinesh Phogat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community