Neeraj Chopra : नीरज चोप्रा डायमंड्स लीगसाठी शस्त्रक्रिया पुढे ढकलणार?

Neeraj Chopra : ऑलिम्पिकनंतर आगामी २ डायमंड्स लीग खेळण्याचा नीरजचा विचार आहे 

121
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आपले जुने आणि यशस्वी प्रशिक्षक का बदलले?
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा (Neeraj Chopra) भारतात परतला नाही. तो स्वीत्झर्लंडमध्ये दुखापतीवर वैद्यकीय सल्ला घेत आहे. पण, रविवारी त्याने तिथूनच भारतीय मीडियाशी संवाद साधला. तेव्हा ऑलिम्पिक सुवर्ण हुकल्यामुळे तो काहीसा निराश दिसला. पण, त्याचवेळी ऑलिम्पिकनंतर पुढील काही स्पर्धांवर लक्ष केंद्रीत करत असल्याचंही त्याने म्हटलं आहे. तो सध्या मॅगलिंगेन इथं आहे. पायाचा स्नायू तसंच जांघेच्या दुखापतीवर तो इथं वैद्यकीय सल्ला घेणार आहे. त्याला शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे.

(हेही वाचा- Senior Section Engineer Railway Salary : रेल्वेतील विभागीय अभियंता काय काम करतो, त्याचा पगार किती?)

‘डायमंड्स लीग (Diamond League) पूर्ण करावी असा माझा विचार आहे. शेवटची स्पर्धा बेल्जिअमला असेल. ती खेळता आली तर खेळावी, असं माझ्या मनात आहे. सप्टेंबरमध्ये भारतात आल्यावर आणखी काही जणांचे वैद्यकीय सल्ले घेणार आहे. कारण, माझी दुखापत आणि त्यावर आवश्यक शस्त्रक्रिया अशी आहे की, मोठी विश्रांती लागेल. मग काही महिने मला खेळता येणार नाही. त्यापूर्वी जमलं तर काही स्पर्धा खेळाव्या असं मला वाटतं,’ असं नीरज यावेळी म्हणाला. नीरजचे प्रायोजक जेएसडब्ल्यू यांनी हा संवाद आयोजित केला होता. (Neeraj Chopra)

स्वीत्झर्लंडमध्ये नीरजचे प्रशिक्षक क्लाऊस बार्टोनिझही त्याच्याबरोबर आहेत. त्यांचा सरावही सुरू आहे. २२ ऑगस्टला होणारी डायमंड्स लीग तो खेळणार आहे. तर झ्युरिचमधील लीगही ५ सप्टेंबरला आहे. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान बेल्जिअम इथं डायमंड्स लीगची अंतिम स्पर्धा पार पडेल. सध्या या तीन लीगमध्ये नीरज खेळणार आहे. त्यानंतर तो भारतात परतेल.  (Neeraj Chopra)

(हेही वाचा- … तर कारसेवा पुन्हा करू; MLA Nitesh Rane यांचा हल्लाबोल)

डायमंड्स लीगमध्ये यावर्षाच्या क्रमवारीत नीरज चोप्रा चौथ्या क्रमांकावर आहे. २०२२ मध्ये नीरजने भालाफेकीतील सर्वोत्तम मानलं जाणारं डायमंड्स लीग विजेतेपद पटकावलं होतं. २०२३ मध्ये तो उपविजेता होता. यंदा तो लीगच्या सर्व स्पर्धा दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. (Neeraj Chopra)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.