-
ऋजुता लुकतुके
ऑलिम्पिक चॅम्पियन आणि २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदं नावावर असलेला नोवाक जोकोविच (Novak Djokovic) सध्या टेनिस खेळात व्हीडिओ रेफरल प्रणाली नसल्यामुळे वैतागला आहे. सिनसिनाटी मास्टर्स या स्पर्धेदरम्यान पंचांचा एक निर्णय खेळाडूच्या विरोधात गेला. आणि रिप्लेमध्ये खेळाडूचं म्हणणं योग्य असल्याचं दिसलं. पण, व्हीडिओ रेफरलची सोय नसल्यामुळे त्याला दादही मागता आली नाही. त्यानंतर टेनिसमध्ये व्हीडिओ रेफरलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जोकोविचने अशी प्रणाली नसणं हे खेळासाठी लाजिरवाणं असल्याचं बोलून दाखवलं आहे. (DRS in Tennis)
जॅक ड्रेपर विरुद्ध फेलिक्स ऑगर एलियासाईम या सामन्यात हा प्रकार घडला. सामन्यातील शेवटचा गुण हा वादग्रस्त ठरला. चेंडू सीमारेषेपलीकडे जाण्यापूर्वी ड्रेपरच्या रॅकेटला लागला होता, असं रिप्लेमध्ये दिसलं. फेलिक्सचाही तोच दावा होता. पण, मैदानातील पंचांनी कौल ड्रेपरच्या बाजूने दिला. त्याने त्याच गुणाच्या आधारे सामना जिंकलाही. (DRS in Tennis)
(हेही वाचा- Neeraj Chopra : नीरज चोप्रा डायमंड्स लीगसाठी शस्त्रक्रिया पुढे ढकलणार?)
‘टेनिसमध्ये असा वादाचा प्रसंग उद्भवला तर त्यावर निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे रिप्ले बघण्याचीही सोय नाही, हे लाजिरवाणं आहे. इतकंच नाही तर सीमारेषेवर उभे असलेल्या पंचांनी दिलेला निर्णयही चेअर अंपायरना बदलता येत नाही, हे सगळंच चुकीचं आहे,’ असं जोकोविचने सोशल मीडियावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. (DRS in Tennis)
It’s embarrassing that we don’t have video replay of these kind of situations on the court. What’s even more ridiculous is that we don’t have the rule in place that would allow chair umpires to change the original call based on the video review that happens off the court!… https://t.co/MQsmqpTmXK
— Novak Djokovic (@DjokerNole) August 17, 2024
ऑलिम्पिक सुवर्ण पदकानंतर जोकोविचने टेनिसमधून काही काळ विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तो सिनसिनाटी मास्टर्स खेळत नाहीए. पण, तिथे सुरू असलेल्या व्हीडिओ रेफरलच्या चर्चेची दखल त्याने घेतली आहे. ‘सामन्यात नेमकं काय घडलं हे सगळे टिव्हीसमोर बसून पाहू शकतात. रिप्लेमधून लोकांना कळतं नेमकं काय झालं होतं. तरीही गुण योग्य खेळाडूला मिळतच नाही. निदान सीमारेषेवरील निर्णयांसाठी हॉकआय सारखी पद्धती उपलब्ध आहे. तिचा वापर इतर खेळांत होतोय. मग टेनिसमध्ये का नाही?’ असा प्रश्न जोकोविचने विचारला आहे. (DRS in Tennis)
(हेही वाचा- Vinesh Phogat : हरयाणाच्या पदक विजेत्यांचं झालं नाही, असं कौतुक विनेशचं का?)
टेनिसमध्ये फक्त युएस ओपन ही एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा हॉक आय प्रणाली वापरते. बाकी कुठल्याही स्पर्धेत टिव्ही रिप्ले पाहण्याची सोय नाही. अलीकडे ऑलिम्पिकमध्येही अमेरिकन टेनिसस्टार कोको गॉफने रेफरल यंत्रणा नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. (DRS in Tennis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community