राज्यामध्ये डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याचा डाव म्हणजे हा रडीचा डाव आहे हे आता स्पष्ट झालेल आहे. कारण आता जे सत्तेमध्ये आहे त्यांना पुन्हा सत्तेमध्ये येण्याची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने निवडणुका लांबवत आहेत, असं स्पष्ट मत राकपा शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर ती आले आहेत. रविवारी रात्री त्यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.
(हेही वाचा – Vinesh Phogat : हरयाणाच्या पदक विजेत्यांचं झालं नाही, असं कौतुक विनेशचं का?)
त्यांचे स्वागत पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शहराध्यक्ष गजानन शेलार ,गोकुळ पिंगळे, मुन्ना शेख व इतर पदाधिकाऱ्यांनी केले. सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, राज्यामध्ये निवडणुका पुढे ढकलण्याची माहिती पुढे येत आहे, यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा पूर्णपणे रडीचा डाव आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षांनी कितीही प्रयत्न केले, तरी निकाल बदलणार नाही. पुन्हा सत्तेमध्ये येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीप्रमाणे दिवस काढण्याचे काम सुरू आहे, असे सांगून त्या म्हणाले की, लाडक्या बहिणी शिवाय पास होता येत नाही आणि पैसे वाटप करूनही निवडणुका जिंकता येत नाही हे आता दिसून येत असल्यामुळे कसेही करा काहीही करा आणि निवडणुका पुढे ढकला हे सत्ताधारी पक्षाचे धोरण असल्याचे समोर येत आहे पण त्यातून यश किती मिळेल हा प्रश्नच कायम आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना काळे झेंडे दाखवण्यासंदर्भामध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले की, मानसन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे मला याचे वाईट वाटतं की अजित पवारांना आज काळे झेंड्यांचे दर्शन झाले. अर्थात हा विषय महायुती अंतर्गतला आहे. त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणं योग्य होणार नाही. आज रक्षाबंधन आहे आपण अजित पवार यांना रक्षाबंधनची राखी बांधणार का असे विचारले असता त्या म्हणाले की, आधी लग्न कोंढाण्याचं मी नाशिकमध्ये कार्यक्रम घेतलेले आहेत त्यामुळे मी या ठिकाणी आहे. असे सांगून त्यांनी या विषयावरती अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community