-
ऋजुता लुकतुके
ऑक्टेबर महिन्यात होणारी महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा आता संयुक्त अरब अमिरातीत भरवण्यावर आयसीसी विचार करत आहे. आधी ही स्पर्धा बांगलादेशला होणार होती. पण, तिथल्या अस्थिर परिस्थितीमुळे आयसीसीने आधी भारताला विश्वचषक आयोजनाचं आवाहन केलं. पण, बीसीसीआयने (BCCI) त्यासाठी असमर्थता दर्शवल्यावर आता युएईचा विचार होत आहे. दुबई, आबूधाबी आणि शारजा अशी तीन ठिकाणं तिथे क्रिकेट आयोजनासाठी सज्ज आहेत. त्यामुळे कमी वेळेतही तिथे आयोजन होऊ शकतं, असं आयसीसीला वाटतं. (Women’s T20 World Cup)
(हेही वाचा- Rahul Gandhi यांना होणार का २ वर्षांचा तुरुंगवास ? पुणे सत्र न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष)
त्याचवेळी खुद्द बांगलादेश क्रिकेट मंडळही स्पर्धा आपल्याकडेच व्हावी म्हणून प्रयत्नशील आहे. देशांतर्गत परिस्थिती निवळेल आणि तो सुरळीत स्पर्धा भरवू शकतील असं त्यांना वाटतंय. इतकंच नाही तर झिंबाब्वे आणि श्रीलंकाही आयोजनासाठी उत्सुक असल्याचं समजतंय. त्यामुळे या आठवड्यात आयसीसीला काय तो निर्णय घ्यावा लागेल. (Women’s T20 World Cup)
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा ही ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान व्हायची आहे. यात १० संघ सहभागी होणार आहेत. सुरुवातीला आयसीसीने आयोजनासाठी बांगलादेशच्या खालोखाल दुसरा पर्याय असलेल्या भारताला आणि पर्यायाने बीसीसीआयला विचारलं होतं. ‘आयसीसीने आपल्याला विचारणा केली होती. पण, आम्ही स्पष्टपणे नकार दिला आहे. कारण, आपल्याकडे पावसाळा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पुढील वर्षी महिलांचा एकदिवसीय विश्वचषक भरवणार आहोत. त्यामुळे सलग दोन आयसीसी स्पर्धा भरवण्याचा आमचा काहीही विचार नाही,’ असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे. (Women’s T20 World Cup)
(हेही वाचा- महाराष्ट्रातील निवडणुकांविषयी Supriya Sule यांचे सरकारवर आरोप; म्हणतात…)
त्यामुळे आता महिलांची टी-२० स्पर्धा नेमकी कुठे भरवायची यावर आयसीसीला याच आठवड्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. (Women’s T20 World Cup)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community