Rain Updates : ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत पावसाचे दिवस फक्त पाच

1165
Rain Updates : ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत पावसाचे दिवस फक्त पाच
Rain Updates : ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत पावसाचे दिवस फक्त पाच

यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या. खरिपांची पिके सध्या जोमात आहेत. जुलै अखेर व ऑगस्टच्या सुरवातीला पुण्यात झालेल्या दमदार पावसाने उजनी धरणही भरले आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ देण्यास सुरवात केली आहे. पावसाने चिंता वाढविण्यास सुरवात केली आहे. सध्या वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे. (Rain Updates)

(हेही वाचा – Rahul Gandhi यांना होणार का २ वर्षांचा तुरुंगवास ? पुणे सत्र न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष)

यंदाच्या पावसाळ्यातील मघा नक्षत्राला सुरवात झाली आहे. या दिवशी सूर्याचा मघा नक्षत्रात प्रवेश झाला. या प्रवेशाचे वाहन कोल्हा होते. नक्षत्र बदलल्याने वातावरणात बदल झाला आहे. उन्हाचा वाढलेला चटका सध्या कमी झाला आहे. ढगाळ वातावरण आणि उकाडा यामुळे सध्या सोलापुरात संमिश्र वातावरण झाले आहे. पाऊस किरकोळ स्वरूपात हजेरी लावत असल्याने मुसळधार पावसाची प्रतिक्षा अद्यापही कायम आहे.

मागील १-२ दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पहायला मिळाल. अद्यापही विविध भागात पावसाची हजेरी (Maharashtra Monsoon Update) पाहायला मिळणार आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Rain Updates)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.