गणेशोत्सव येताच Mumbai-Goa Highway चे राजकारण सुरु

253
गणेशोत्सव येताच Mumbai-Goa Highway चे राजकारण सुरु

मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्याच्या बतावण्या होत असतानाच यंदाही हा मार्ग खड्ड्यात गेला आहे. पळस्पे ते नागोठणे या मार्गाचे काम पुन्हा सुरू केल्याने या मार्गात असंख्य खड्डे तयार झाले आहेत. गणेशोत्सव आल्यानंतर मुंबईतील चाकरमानी गावाच्या दिशेने निघतात. अशावेळी मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai-Goa Highway) जात असताना अनेक अडचणींना तोंड देत त्यांना गावापर्यंत पोहोचावे लागते. त्यातच यंदा विधानसभा निवडणुका असल्याने राजकीय नेत्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळेच महायुतीतील नेते देखील एकमेकांवरती याचे खापर फोडताना दिसून येत आहेत.

(हेही वाचा – Kolkata Doctor Case : डॉक्टरांना जगू द्या! कोलकाता प्रकरणावर आयएमए अध्यक्षांचे भावनिक पत्र)

रामदास कदम यांनी चव्हाणांवर खापर फोडले

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपाच्या २ ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायेत असा आरोप शिवसेना नेते रामदास कदमांनी केला तर रामदास कदम हे अडाणी, त्यांनी १५ वर्षात काय केले असा परखड सवाल करत चव्हाणांनी पलटवार केला आहे. (Mumbai-Goa Highway)

आम्हाला बोलावे लागते आमचा नाइलाज आहे…

कोकणातील जनता आम्हाला सवाल विचारते, आम्हालाही सहन करण्याची मर्यादा आहे. युतीत असतानाही आम्ही हे बोलतोय. घरचा आहेर दिला पण आम्हाला नाईलाज आहे. पालकमंत्री म्हणून आमचे उदय सामंत अतिशय चांगले काम करतायेत. एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम उदय सामंत करतायेत. कोकणात युतीमध्ये कुठेही अडचण नाही. दापोलीतील भाजपा मंडळी राक्षसी हेतूने काम करतायेत. आमदार योगेश कदम यांना बदनाम करण्याचं काम करतायेत. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली आहे. हे थांबवा, आम्ही विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलोय पण आमचा विश्वासघात होतोय असंही रामदास कदमांनी म्हटलं. (Mumbai-Goa Highway)

(हेही वाचा – महाराष्ट्रातील निवडणुकांविषयी Supriya Sule यांचे सरकारवर आरोप; म्हणतात…)

प्रभू श्रीरामाचा वनवास १४ वर्षांनी संपला. मात्र मुंबई-गोवा मार्गाचा आमचा वनवास मात्र संपत नाही. त्याचं दु:ख माझ्या मनात आहे. माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे. एक शिष्टमंडळ घेऊन मी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देखील भेटणार आहे. त्यांनी स्वत: लक्ष घालावं अशी मी मागणी करणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केवळ आश्वासन दिले. गणपतीच्या तोंडांवर देखील रस्त्याची अवस्था खूप खराब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालणार असल्याचं म्हटलं आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.