Monkeypox virus मुळे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला महत्त्वाच्या सूचना

154
Monkeypox : सेव्हन हिल्स रुग्णालय 'या' आजारांसाठीही सज्ज, १४ खाटांचा कक्ष आरक्षित

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला (Monkeypox virus) आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर राज्य सरकारने याबाबत खबरदारीसाठी आरोग्य यंत्रणेला सूचना जारी केल्या आहेत. विमानतळे बंदरांवरून मंकीपॉक्स रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने आरोग्य अधिकारी यांची नियमित समन्वय ठेवण्याचा सूचना केल्या असून मंकी पॉक्स रुग्णांच्या विलगीकरणासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा –Bangladesh Violence : …तर ढाक्यावर बॉम्ब वर्षाव करून बांगलादेशला ठिकाणावर आणा; आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ज्ञ मयांक जैन यांचे मत )

मंकीपॉक्स (Monkeypox virus) हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रुग्ण दोन ते चार आठवड्यात बरा होतो परंतु लहान मुलांमध्ये आणि इतर काही रुग्णांमध्ये तर गंभीर स्वरूप ही धारण करू शकतो. या आजाराचा मृत्यू दर सर्वसाधारणपणे तीन ते सहा टक्के असल्याने राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मंकीपॉक्स संदर्भात विमानतळे आणि बंदरांवर सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून खातरजमा करून संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी अशा सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

मंकीपॉक्सची लक्षणे
सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, स्नायू दुखणे, ताप आणि थकवा यांचा समावेश होतो. याची लक्षणे सुरुवातीला इन्फ्लूएंझासारखे दिसू शकतात. हा रोग कांजिण्या, गोवर आणि देवीच्या आजारा सारखा दिसतो. (Monkeypox virus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.