… तर मी राजकारणातूनही निवृत्त होईन; DCM Devendra Fadnavis यांचे जरांगे पाटलांना आव्हान

236
Reservation दिले त्यांनाच पाडण्याची भाषा; Maratha समाजात रोष!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटले की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सोमवारी (१९ ऑगस्ट) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांचा आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा विरोध असल्याचा आरोप केला. राज्यात मराठा आणि धनगर हे दोन मोठे समाज आहेत. मात्र, या दोघांना संपविण्याचे काम फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देतील. पण त्यांना फडणवीस आरक्षण देऊ देत नाहीत. फडणवीस जात जाणूनबुजून आरक्षण मिळू देबर नसतील तर त्याची फळं त्यांना भोगावी लागतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

(हेही वाचा – Rain Updates : ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत पावसाचे दिवस फक्त पाच)

जरांगे पाटील यांच्या या आरोपाचा फडणवीस यांनी समाचार घेतला. मला कल्पना आहे की, मनोज जरांगे यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. मात्र, हे देखील सांगितले पाहिजे की राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. मी त्याही पुढे जाऊन सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आहोत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावे, असे फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले.

आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले, ते एकतर मी घेतले किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. तसेच मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाणीपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न हा अयोग्य आहे, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – New Delhi: एसीचे आउटडोर यूनिट डोक्यावर पडल्याने तरुण जागीच ठार, व्हिडीओ व्हायरल)

आरोप पूर्णपणे चुकीचा : मुख्यमंत्री शिंदे

देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपात तथ्य नाही, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मराठा आरक्षण न मिळण्यामागे विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या कारकिर्दीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम झाले होते. मी सुद्धा मराठा आरक्षणाच्या समितीत होतो. आम्ही जो काही निर्णय घेतो तो सर्वानुमते घेतो, असेही शिंदे यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.