मुलुंडमध्ये Bird Park चा मार्ग मोकळा; ‘त्या’ जागेवरील उद्यानाचे आरक्षण रद्द

1707
मुलुंडमध्ये Bird Park चा मार्ग मोकळा; 'त्या' जागेवरील उद्यानाचे आरक्षण रद्द

मुलुंड पश्चिम येथील नाहुल गावात पक्षी उद्यान (Bird Park) बांधण्यात येणार असून यासाठी पक्षी उद्यानासाठी मुलुंड येथील उद्यान आणि बगीचाचे आरक्षणच रद्द करण्यात येत असून या भूखंडावर आता प्राणिसंग्रहालयाचे आरक्षण टाकण्यात येत आहे. त्यामुळे या भूखंडावर प्राणिसंग्रहालयाचे आरक्षण टाकण्यात आल्याने आता या जागेवर आता पक्षी उद्यान बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

(हेही वाचा – WhatsApp New Feature : व्हॉट्सॲप चॅट आता दिसणार इन्स्टाग्रामसारखं?)

नाहूर मुलुंडमधील नगर भू क्रमांक ७०६८/ड, ७१०८,७१२४, ७६२अ आणि ७६३अ मौजे नाहूर हा भूखंड आरओएस १.५ हा भूखंड बगीचा आणि उद्यानासाठी आरक्षित आहे. याच जागेवर पक्षीगृह (Bird Park) बांधण्याची मुलुंडमधील स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांनी केल्यानंतर या पक्षीगृहाच्या बांधणीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बगीचा आणि उद्यानासाठी आरक्षित जागेवर पक्षीगृह बांधणे शक्य नव्हते. त्यामुळे या जागेवरील विद्यमान आरक्षण बदलून त्यावर प्राणिसंग्रहालयाचे आरक्षण टाकण्यात येत असून याची प्रक्रिया नगरविकास खात्याच्या माध्यमातून राबवली जात आहे. त्यामुळे विद्दमान आरक्षण रद्द करून त्यावर प्राणिसंग्रहालय असे आरक्षण टाकण्यात येत असल्याने या जागेवर पक्षीगृह बांधणे शक्य होणार आहे.

(हेही वाचा – … तर मी राजकारणातूनही निवृत्त होईन; DCM Devendra Fadnavis यांचे जरांगे पाटलांना आव्हान)

हे पक्षीगृह (Bird Park) बांधण्यात येत असलेल्या आरक्षित जागेचे क्षेत्रफळ हे १७९५८.८० चौ. मी. एवढे असून ही जागा महापालिकेच्या मालकीची आहे. या पक्षीगृहात नागरिकांसाठी जॉगिंग पार्क तसेच खुली व्यायामशाळेसह इतर सुविधा असतील. हे पक्षी उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवले जात असून यासाठी आवश्यक त्या राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानगी मिळवण्यात येत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.