Metro Project 4 च्या मार्गिकेसाठी घाटकोपरमधील महापालिकेची ११८९ चौरस मीटरची जागा भाड्याने

1601
Metro Project 4 च्या मार्गिकेसाठी घाटकोपरमधील महापालिकेची ११८९ चौरस मीटरची जागा भाड्याने

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्ग ४ (Metro Project 4) साठी घाटकोपर येथील महापालिकेच्या मालकीची १० चौरस मीटरची जागा कायमस्वरुपी आणि ११८९.२१ चौ. मीटरची जागा तात्पुरत्या स्वरुपात एमएमआरडीएला भाड्याने दिली जाणार आहे. यामध्ये भाड्याने देण्यात येणारी जागा ही मेट्रो रेल्वे सुरु होईपर्यंत दिली जाणार असून रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर भाडे तत्वावर दिलेली जागा महापालिकेला परत करणे एमएमआरडीएला बंधनकारक असणार आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे-४ प्रकल्प राबविण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एमएमआरडीएने मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत व वापरात असलेल्या जागा तात्पुरत्या व कायम स्वरुपात देण्याची मागणी केली. शासकीय तसेच निमशासकीय स्थानिक स्वराज्य सस्थांच्या प्रकल्पासाठी कायमस्वरुपी आवश्यक असलेल्या जमिनी एमएमआरडीएला नाममात्र दराने हस्तांतरित करण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या मेट्रो ४ प्रकल्पाकरता (Metro Project 4) घाटकोपर पश्चिम येथील सिकोवा प्लॉट येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ग्रीन वेस्ट पॅलेटायजेशन प्रकल्पातील अंशत:जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याबाबत मागणी झाली आहे. या जागेवर पूर्वी हरित कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्प उभारण्यात आला होता. परंतु आग लागल्यामुळे हा प्रकल्प बंद असल्याने या प्रकल्पातील जागा काही जागा एमएमआरडीएला तात्पुरत्या स्वरुपात भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – “… तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis असं का म्हणाले?)

प्रकल्पाकरिता असतील स्वतंत्र प्रवेशद्वार

या जागेवर सध्या फक्त प्रकल्पाची शेड आहे. या जागी सध्यास्थितीत ०१ ड्रायवेस्ट सेग्रीगेशन सेंटर, घ.क.व्य. एन विभागाची मोटर लोडर चौंकी व ०१ ग्रीन वेस्ट पॅलेटायजेशन प्रकल्पाचे शेड आहे. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एमएमआरडीएच्या मागणीनसार तात्पुरत्या व कायमस्वरुपाची जागा या त्यांना हस्तांतरित करण्यापूर्वी या जागेवरील ग्रीन वेस्ट पॅलेटायजेशन प्रकल्प पुन्हा सुरू करता यावा व मेट्रो लाईन-४ (Metro Project 4) चे पिलर बांधून झाल्यानंतर उर्वरित जागेतून प्रवेश मिळावा म्हणजे ही जागा हस्तांतरित केल्यानंतर उर्वरित जागेवर सध्याचा ग्रीन वेस्ट पॅलेटायजेशन प्लांटचे शेड एमएमआरडीए मार्फत स्थलांतरित करणे, पुन्हा बांधणी करणे व या भूखंडांवर संरक्षण भिंत त्यांनी बांधून दिल्यानंतर जळालेल्या संपूर्ण वृक्ष छाटणी व पालापाचोळा या जागेवरून हलवून इतरत्र स्थलांतरित करून संपूर्ण जागेची साफसफाई ही एमएमआरडीएच्या वतीने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या जागेवर एमएमआरडीएच्या माध्यमातून १० फूट उंचीची संरक्षक भिंत उभारली जाणार असून सुका कचरा वर्गीकरण केंद्र, ग्रीन वेस्ट पॅलेटायजेशन प्रकल्पाचे शेड व एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु असणारे काम या तीनही वेगवेगळ्या कमांकरिता व प्रकल्पाकरिता स्वतंत्र प्रवेशद्वार असतील. या मेट्रो ४ प्रकल्पासाठी (Metro Project 4) १० चौरस मीटरची जागा एक रुपये प्रती वर्षी एवढ्या नाममात्र दराने कायमस्वरुपी दिली जाणार आहे, तर सुमारे ११८९.२१ चौ. मीटरची जागा ही एक रुपये प्रती वर्षी या दराने तात्पुरती दिली जाणार असून हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने तथा मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर महापालिकेच्या ताब्यात देणे बंधनकारक असेल, असे नमुद केल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.