CBI Raid : सीबीआयने आपल्याच डीएसपीला केली अटक; काय आहे कारण ?

147
CBI Raid : सीबीआयने आपल्याच डीएसपीला केली अटक; काय आहे कारण ?
CBI Raid : सीबीआयने आपल्याच डीएसपीला केली अटक; काय आहे कारण ?

मध्य प्रदेशातील सिंगरौलीतील ‘नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’ (एनसीएल, NCL) मध्ये भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने स्वतःच्याच पोलीस उपअधीक्षकासह (डीएसपी) पाच जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एनसीएलच्या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एनसीएल ही कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत ‘मिनी रत्न’ कंपनी आहे. (CBI Raid)

(हेही वाचा – २३ ऑगस्टला PM Modi युक्रेन दौऱ्यावर, झेलेन्स्की यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा)

अटक करण्यात आलेल्यांमध्ये जबलपूर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेत तैनात असलेले पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) जॉय जोसेफ दामले, एनसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) यांचे खासगी सचिव सुभेदार ओझा, कंपनीचे मुख्य व्यवस्थापक (प्रशासन) लेफ्टनंट ले. कर्नल निवृत्त) बसंत कुमार सिंग, संगम इंजिनिअरिंगचे संचालक आणि कथित मध्यस्थ रविशंकर सिंग आणि त्यांचा सहकारी दिवेश सिंग यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण ?

रविशंकर सिंग विविध कंत्राटदार, व्यापारी आणि एनसीएलच्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये ‘मध्यस्थ’ म्हणून लाच व्यवहारात मदत करत होते. दामले यांना तपास दाबण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच देताना दिवेश सिंगला रंगेहात पकडण्यात आले. रविशंकर सिंग यांच्या सूचनेनुसार त्यांचा कर्मचारी अजय वर्मा याने लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) बसंत कुमार सिंग यांच्याकडून ५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

सीबीआयने १७ ऑगस्ट रोजी नोएडाव्यतिरिक्त सिंगरौली आणि जबलपूर येथे छापे टाकले होते. यात ३.८५ कोटी रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. ही रक्कम एनसीएलच्या कामातील फायद्यांच्या बदल्यात अनेक कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली होती.

एनसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांचे खासगी सचिव आणि व्यवस्थापक (सचिवालय) सुभेदार ओझा, एनसीएलचे माजी सीएमडी भोला सिंग आणि सध्याचे मुख्य दक्षता अधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांच्या घरी झडतीही घेण्यात आली आहे. (CBI Raid)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.