Vinesh Phogat : ….म्हणून क्रीडा लवादाने फेटाळलं विनेशचं अपील

विनेश फोगाटची संयुक्तपणे रौप्य देण्याची मागणी क्रीडा लवादाने फेटाळली होती.

121
Vinesh Phogat : ….म्हणून क्रीडा लवादाने फेटाळलं विनेशचं अपील
Vinesh Phogat : ….म्हणून क्रीडा लवादाने फेटाळलं विनेशचं अपील
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात विनेश फोगाटचं (Vinesh Phogat) वजन १०० ग्रॅम जास्त भरल्यामुळे अंतिम फेरीपूर्वी तिला अपात्र ठरावं लागलं होतं. आणि त्यामुळे तिचं ऑलिम्पिक पदकही हुकलं. अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर विनेशनं केलेलं अपीलही फोटाळण्यात आलं. आता या घटनेला एक दिवस उलटल्यावर क्रीडा लवादाने हे अपील का फेटाळलं याची सविस्तर कारणं दिली आहेत.

त्यांनी विनेश प्रकरणी दिलेला निकालच त्यांनी जाहीर केला आहे. यात त्यांनी दोन गोष्टी प्रामुख्याने स्पष्ट केल्या आहेत. पहिली म्हणजे वजन आटोक्यात ठेवण्याची जबाबदारी कुठल्याही परिस्थितीत खेळाडूची असते. आणि दुसरं म्हणजे वजनी गटात वजनाची कमाल मर्यादा दिलेली असते. आणि या मर्यादेच्या आत वजन ठेवणं हे अनिवार्य आहे. अगदी मासिक पाळी किंवा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे करावं लागलेलं जल सेवन अशा कुठल्याही गोष्टींमुळे वजनात सूट मिळणार नाही, असं कुस्तीतील नियम सांगतो. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवणं हे चुकीचं नव्हतं, असं मत क्रीडा लवादाने नोंदवलं आहे.

(हेही वाचा – Badlapur च्या शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, ४ दिवसांनंतर शाळेचा माफीनामा)

‘इथं खेळाडूची (विनेश) समस्या एकच आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती फेडरेशनने वजन मर्यादेचे अगदी काटेकोर नियम आखून दिलेले आहेत. आणि त्याचा जबाबदारीही खेळाडूंवरच टाकली आहे. अशावेळी वजन जास्त भरलं तर त्यासाठी कुठलीही सूट दिली जाऊ शकत नाही. कारण, नियम सर्वांना आधीपासून माहीत असतात. आणि एका वजनी गटाचे खेळाडूच एकमेकांशी भिडू शकतात. खेळाडूचं वजन जास्त होतं हे खुद्द खेळाडूनेही अमान्य केलेलं नाही. त्यामुळे इथं विषय संपतो,’ असं लवादाने दिलेल्या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.

विनेशने संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली होती. पण, त्याचेही नियम आधीपासून ठरलेले असल्यामुळे स्पर्धेतून बाद झाल्यावर तसा पर्याय तिच्याकडे नाही, असं लवादाने स्पष्ट केलं. नियमानुसार, विनेश स्पर्धेतून बाद झाल्यावर उपान्त्य फेरीत तिने हरवलेली गुझमान लोपेझ ही खेळाडू अंतिम फेरीत पोहोचली. आणि तिला रौप्यही मिळालं. तर अमेरिकन सारा हिल्डरबाल्टला सुवर्ण देण्यात आलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.