-
ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेनं इंडसइंड बँकेला गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रात उतरण्यासाठी आवश्यक परवानगी आणि परवाना देऊ केला आहे. त्यामुळे ही बँक आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून ग्राहकांच्या गुंतवणुकीचं व्यवस्थापन करू शकेल. त्यासाठी इंडसइंड बँकेची एक नवीन उपकंपनी स्थापन करण्यात येईल. आणि या कंपनीतील प्रारंभीची गुंतवणूकही इंडसइंड बँकेकडूनच होईल. (IndusInd Bank Mutual Fund)
त्यानुसार आता इंडसइंड असेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. या कंपनीला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची परवानगी असेल. तसं परवानगीचं पत्र रिझर्व्ह बँकेनं सोमवारी इंडसइंड बँकेला दिलं आहे. इंडसइंड बँक ही परदेशी बँक असून तिची मुख्य बँक असलेली इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग लिमिटेड ही कंपनी मॉरिशसमध्ये आहे. (IndusInd Bank Mutual Fund)
(हेही वाचा – Vinesh Phogat : ….म्हणून क्रीडा लवादाने फेटाळलं विनेशचं अपील)
बँकिंग आणि वित्तीय मालमत्तेत या कंपनीची मोठी गुंतवणूक जगभरात आहे. त्यातलाच एक भाग आहे इंडरइंड बँक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी. या कंपनीला भारतात बँकिंग सेवांसाठीचा परवाना मिळाला आहे. इंडसइंड होल्डिंग लिमिटेड ही कंपनी आता भारतात गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी सुरू करण्यासाठी इन्व्हेस्को असेट मॅनेजमेंट इंडिया लिमिटेड या कंपनीबरोबर संयुक्त करार करणार आहे. इन्व्हेस्को कंपनीतील ६० टक्के वाटा आता इंडसइंड होल्डिंग कंपनी विकत घेणार आहे. (IndusInd Bank Mutual Fund)
सध्यातरी ही कंपनी भारतात फक्त म्युच्युअल फंडातच गुंतवणूक करू शकेल.
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=klsWVwD1XJ0
Join Our WhatsApp Community