-
ऋजुता लुकतुके
आयपीएलमधील एक फ्रँचाईजी लखनौ सुपर जायंट्स ही आपला नवीन मार्गदर्शक म्हणून झहीर खानशी (Zaheer Khan) चर्चा करत आहे. क्रिकबझ या वेबसाईटने याविषयीची बातमी सोमवारी दिली आहे. २०२३ पर्यंत गौतम गंभीर हा संघाचा मुख्य मार्गदर्शक किंवा मेंटॉर होता. त्यानंतर यावर्षी गंभीर कोलकाता नाईट रायडर्सकडे गेला. आणि आता तर तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे.
गंभीरच्या बरोबर लखनौ संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलही भारतीय संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून फ्रँचाईजी सोडून गेला आहे. अशावेळी ही फ्रँचाईजी आता भारताचा माजी तेज गोलंदाज झहीर खानकडे (Zaheer Khan) आशेनं पाहत आहे. खरंतर झहीर खानकडे (Zaheer Khan) भारतीय संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून पाहिलं जात होतं. त्याची बीसीसीआयबरोबर बोलणीही सुरू होती. पण, ऐनवेळी गंभीरने समोर ठेवलेल्या मॉर्केलच्या प्रस्तावाला बीसीसीआयने होकार दिला. आणि त्यामुळे झहीर सध्या मोकळाच आहे.
(हेही वाचा – IndusInd Bank Mutual Fund : इंडसइंड बँकेला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी)
४५ वर्षीय झहीर खान (Zaheer Khan) २००० च्या दशकात भारतीय संघातील मुख्य तेज गोलंदाज होता. आणि संघातील तरुण गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याचं काम तो करत असे. झहीर लखनौ फ्रँचाईजीकडे गेला तर त्यांच्याकडे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगरच्या हाताखाली जाँटी ऱ्होड्स, ॲडम व्होगस, लान्स क्लूसनर आणि आता झहीर खान (Zaheer Khan) अशी तगडी प्रशिक्षकांची फळी असेल.
लखनौ सुपर जायंट्स ही फ्रँचाईजी संजीव गोयंका समुहाने ७०९० कोटी रुपयांना लिलावात विकत घेतली आहे. २०२२ मध्ये आपली पहिली लीग खेळणाऱ्या या फ्रंचाईजीने पहिले दोन हंगाम बाद फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर २०२४ मध्ये मात्र संघाचा साखळी फेरीतच पराभव झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community