royal rajasthan on wheels या लक्झरी ट्रेनचे किती आहे भाडे?

78
royal rajasthan on wheels या लक्झरी ट्रेनचे किती आहे भाडे?

रॉयल राजस्थान ऑन व्हील्स (royal rajasthan on wheels) ही एक भारतीय पर्यटक लक्झरी ट्रेन आहे जी राजस्थानसह इतर राज्यांचाही प्रवास करते. यामध्ये नवी दिल्ली, जोधपूर, उदयपूर, चित्तोडगड, सवाई माधोपूर, जयपूर, खजुराहो, वाराणसी आणि आग्रा या राज्यांचा समावेश आहे. प्रवाशांना राजस्थानमधील अनेक प्रमुख पर्यटन, वन्यजीव आणि वारसा स्थळांवर नेले जाते.

रॉयल राजस्थान ऑन व्हील्स (royal rajasthan on wheels) जानेवारी २००९ मध्ये लाँच करण्यात आली. नावाप्रमाणेच, रॉयल राजस्थान ऑन व्हील्सचा प्रवास तुम्हाला खऱ्या अर्थाने राजस्थानचा शाही अनुभव मिळवून देतो. रॉयल राजस्थान ऑन व्हील्सवर प्रवास करताना, तुम्ही भारताच्या वाळवंटातील राजधानीच्या स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा आनंद घेऊ शकतात.

(हेही वाचा – Jobs in India : भारतातील नोकऱ्यांचं भयानक वास्तव, ५७ टक्के नोकऱ्या २०,००० रुपयांच्या खाली)

या ट्रेनमध्ये विविध प्रकारच्या सुविधाही उपलब्ध आहेत –

रेस्टॉरंट
प्रवासी सलून
लाउंज बार
एलसीडी टीव्ही
एसी बेडरूम
व्यायामशाळा
स्पा
बार

ट्रेनमध्ये दोन सुपर डिलक्स सूट, १३ डिलक्स सलून, दोन रेस्टॉरंट बार, स्पा, बोर्ड रूम, वाय-फाय इत्यादी सर्व आधुनिक सुविधा आहेत.

स्वर्ण महल आणि शीश महल या दोन उत्कृष्ट रेस्टॉरंट्ससह रॉयल राजस्थान ऑन व्हील्सचा प्रवास अधिक रोमांचक आणि चवदार बनतो. इथे केवळ पारंपारिक राजस्थानी पाककृतीच मिळत नाही, तर प्रवासी कॉन्टिनेंटल, चायनीज आणि इतर अनेक प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. इथे उत्तम वाइन आणि मद्य यांचा प्रिझमॅटिक कलेक्शन असलेल्या बारमध्ये जाऊ शकता.

(हेही वाचा – Vikroli Assembly Election 2024 : राऊत यांना रस्त्यावर फिरण्याची वेळ)

असा असतो रॉयल राजस्थान ऑन व्हील्सचा प्रवास

दिवस ०१, रविवार (संध्या. ०४:३०): नवी दिल्ली
दिवस ०२, सोमवार (सकाळी ०९:१५ – संध्या. ०५:१०): जोधपूर
दिवस ०३, मंगळवार (सकाळी ०८:०० – दुपारी ०२:३०): उदयपूर
दिवस ०३, मंगळवार (संध्या. ०४:४५ – रात्री १०:००): चित्तोडगड
दिवस ०४, बुधवार (सकाळी ०५:३० – सकाळी ११:००): सवाई माधोपूर
दिवस ०४, बुधवार (दुपारी ०१:१५ – रात्री १०:१५): जयपूर
दिवस ०५, गुरुवार (सकाळी ११:०० – संध्या. ०६:३०): खजुराहो
दिवस ०६, शुक्रवार (सकाळी ०६:०० – संध्या. ०६:००): वाराणसी
दिवस ०७, शनिवार (सकाळी ०५:०० – रात्री ११:००): आग्रा
दिवस ०८, रविवार (सकाळी ०७:००): नवी दिल्ली

गाडीचे भाडे किती आहे?

जर तुम्हाला राजस्थान आणि आसपासच्या राज्यांना भेट द्यायची असेल तर ही ट्रेन प्रवासासाठी उत्तम आहे. या ट्रेनचे शुल्क ३ लाख ७८ हजार रुपयांपासून सुरू होते. तेही एका व्यक्तीसाठी सात रात्रीचे पॅकेज. वेगवेगळ्या सुविधांनुसार दर आणखी वाढू शकतात. प्रवाशांना आपल्या जोडीदारासोबत या ट्रेनमध्ये (royal rajasthan on wheels) प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल, तर त्यासाठी त्यांना ७ लाख रुपये खर्च करावे लागतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.