Haryana Assembly Elections : हरियाणात थर्ड फॅक्टर बिघडवणार समीकरणे ?

138
Haryana Assembly Election : हरियाणात मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

भाजपा आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांकडे यावेळीही हरियाणातील सत्तेचे प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे. मात्र, छोटे पक्ष आणि अपक्षांचा थर्ड फॅक्टर त्या दावेदारांची राजकीय समीकरणे बिघडविणारा ठरू शकतो. छोटे पक्ष, अपक्षांना लक्षणीय पाठिंबा मिळाल्यास भाजपा आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते. (Haryana Assembly Elections)

हरियाणात १ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक (Assembly Elections) होणार आहे. त्या राज्यात भाजपा सत्तेवर आहे. तर, काँग्रेस प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. त्या पक्षांमध्येच खरी लढत होणार असल्याचे मानले जाते. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीने त्या चित्रावर जवळपास शिक्कामोर्तब केले. हरियाणात लोकसभेच्या एकूण १० जागा आहेत. त्यातील निम्म्या निम्म्या जागा भाजपा आणि काँग्रेसच्या वाट्याला आल्या. अर्थात, तो निकाल भाजपाच्या गोटात चिंता निर्माण करणारा आणि काँग्रेसचा उत्साह वाढवणारा ठरला. भाजपाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत सर्व जागा जिंकल्या होत्या. (Haryana Assembly Elections)

(हेही वाचा – Badlapur: बदलापूरातील आंदोलनाला हिंसक वळण! शाळा फोडली, पोलिसांवर दगडफेक)

छोटे पक्ष, अपक्ष ठरणार भाजपा आणि काँग्रेससाठी डोकेदुखी

निवडणुकीत हरियाणातील सर्व जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप त्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. हरियाणातील लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि आपने हातमिळवणी करून लढवती, त्यामुळे प्रमाणात विरोधकांच्या मतांचे एकत्रीकरण होऊन भाजपाला फटका बसला. मात्र, विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) तसे घडणार नाही. तिसरा घटक असणारे छोटे पक्ष, अपक्ष अधिक मतं मिळवतील. त्यामुळे विरोधकांच्या मतांचे विभाजन होईल, असे भाजपाला वाटते. तर, भाजपापासून लोकसभा निवडणुकीत निर्णायक प्रमाणात मतदार दुरावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Haryana Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.