Badlapur प्रकरणाने सरकार अॅक्शन मोडवर! सर्वच शाळांमध्ये स्थापन होणार विशाखा समिती

186
Badlapur प्रकरणाने सरकार अॅक्शन मोडवर! सर्वच शाळांमध्ये स्थापन होणार विशाखा समिती
Badlapur प्रकरणाने सरकार अॅक्शन मोडवर! सर्वच शाळांमध्ये स्थापन होणार विशाखा समिती

बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तर संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.

सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन होणार
याप्रकरणात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतक्रिया देत याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक प्रमाणे चालवला जाईल, असं सांगितलं. कॅार्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर सर्व शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन होणार आहे. यात नववी-दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी असतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसेच या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे, अशी मागणीही आपण गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचंही केसरकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील शाळेत सीसीटीव्ही चालू अवस्थेत नसल्याचे आढळले आहे. त्यावरही कारवाई होईल, असेही केसरकर म्हणाले. (Badlapur)

दीपक केसरकर काय म्हणाले?
सखी सावित्री समिती प्रत्येक शाळेत राहावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या, या शाळेत ही समिती होती की नाही याची माहिती घेणार. मुलींची सुरक्षा ही प्राथमिकता आहे. आदेश दिल्यावरही जर सखी सावित्री समिती स्थापन झाली नसेल, त्याचा परिणाम मुलींवर होणार असेल, तर त्या ब्लॉग एज्युकेशन ऑफीसरवर तातडीने कारवाईचे आदेश दिले. अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून चर्चा करतोय. सखी सावित्री प्रत्येक शाळेत स्थापन झाली तर मुलींना दिलासा मिळेल. पोस्को अॅक्टनुसार इ-बॉक्सची संकल्पना समजू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक शाळा-हॉस्टेलमध्ये तक्रार बॉक्स ठेवण्यात येत आहे. (Badlapur)

विशाखा समिती आता शाळेतही अनिवार्य असेल, मोठ्या विद्यार्थिनींसाठी विशाखा समिती असेल. याचा निर्णय आजच घेतला. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये. १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान प्रकार घडला, १८ ऑगस्टला तक्रार करण्यात आली, १२ तास दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. शाळेला नोटीस बजावण्यात आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले, शिक्षिका दिपाली देशपांडे, कामिनी गायकर, निर्मला बोरे यांना निलंबित करण्यात आलं आहे. (Badlapur)

प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कम्पल्सरी करण्यात आला आहे. सरकारी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. खासगी शाळांना कम्पल्सरी आहे, पण या शाळेतील सीसीटीव्ही बंद असल्याचं आढळून आलं. त्यामुळे सीसीटीव्ही बंद असेल तर जबाबदारी शाळेची असेल. अक्षय शिंदेंवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल, कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण जावं यासाठी उपमुख्यमंत्र्यांशी बोलेण, स्पेशल वकील नियुक्त केला जाईल, लवकरात लवकर शिक्षा झाली तर लोकांना दिलासा मिळेल. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. पीडित चिमुरडी आणि कुटुंबाला सर्वप्रकारची मदत केली जाईल, चिमुकलीचं समुपदेषण केलं जाईल. तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश हवा असेल तर त्यासाठी मदत होईल. (Badlapur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.