उन्हाळ्यात उणे ६० टक्क्यांवर पोचलेले उजनी धरण (Ujani Dam) सध्या १०३ टक्के भरले आहे. १ जूनपासून उजनी धरणात एकूण १३१ टीएमसी पाणी आले असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ४ ऑगस्टपासून त्यातील ३६ टीएमसी पाणी भीमा नदी आणि कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून सोडून देण्यात आले आहे. सध्या उजनीत दौंडवरून सहा हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे.जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणामुळे रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र वाढले आहे. सध्या जिल्ह्यातील पावणेबारा लाख हेक्टरपैकी जवळपास पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्राला उजनी धरणातून थेट पाणी मिळते.
(हेही वाचा – Lateral Entry भरती काँग्रेसनेच सुरु केलेली; मोदी सरकारने ती रद्द केली)
जिल्ह्यात ४५ हून अधिक साखर कारखाने असून दीड लाख हेक्टरवर उसाची लागवड आहे. दुसरीकडे जिल्ह्यात सव्वालाखांहून अधिक हेक्टरवर फळबागा आहेत. उजनी धरणामुळे (Ujani Dam) नेहमीच दुष्काळाच्या यादीत असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले. दरवर्षी उन्हाळ्यात शेतीसाठी उजनीतून तीन आवर्तने सोडली जातात. पण, उजनी धरण ज्यावेळी उणे २० टक्के होते, त्यावेळी कॅनॉल, बोगद्यातून पाणी सोडता येत नाही. पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेले उजनी धरण अनेक वर्षे बहुतेकवेळा उन्हाळ्यात उणे होते ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील १४ ते १६ टीएमसी गाळ काढणे व धरणातून खाली सोडलेले पाणी साठवणे, यावर विशेष भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community