Badlapur प्रकरणात राष्ट्रीय बालहक्क आयोगाची गंभीर दखल; चौकशीसाठी पथक दाखल होणार

138
Badlapur प्रकरणात राष्ट्रीय बालहक्क आयोगाची गंभीर दखल; चौकशीसाठी पथक दाखल होणार
Badlapur प्रकरणात राष्ट्रीय बालहक्क आयोगाची गंभीर दखल; चौकशीसाठी पथक दाखल होणार

बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तर संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.

या प्रकरणाची राष्ट्रीय बालहक्क आयोगाने (National Commission for Child Rights) गंभीर दखल घेतली आहे. ​​​​​​या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून एक पथक बदलापूरला पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने सांगितले आहे. (Badlapur)

राष्ट्रीय बाल हक्क आयोग काय म्हणाले?
बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. केंद्र सरकारने निर्मित केलेल्या राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी आयोगाकडून एक तपास पथक बदलापूर येथे पाठवण्यात येणार आहे. हे पथक या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करेल. तसेच पोलिसांनी पीडितेच्या पालकांना तक्रार नोंदवण्यासाठी 12 तास थांबवले, ही धक्कादायक बाब आहे. याप्रकरणी राज्य शासनाकडून संबंधित पोलिस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. अशी माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली. (Badlapur)

राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून पाठवण्यात येणाऱ्या या समितीवर माझेही लक्ष असेल. तसेच याप्रकरणी सहभागी असलेल्या सर्व दोषी पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा होईल. त्यासोबतच याप्रकरणाची सखोल चौकशी आम्ही देखील करणार आहोत, असे प्रियांक कानगो यांनी दिली. (Badlapur)

काय आहे प्रकरण?
बदलापूर शहरातील एका नमांकित शाळेत तीन वर्ष आठ महिने आणि सहा वर्ष वय असलेल्या दोन लैंगिक मुलींवर शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची तक्रार नोंदवण्यास विलंब झाल्यानंतर शाळेतील पालकांच्या संतापाचा उद्रेक झाला. याबाबत पालकांसोबत सर्वसामान्य जनताही रस्त्यावर उतरली. आधी सकाळी शाळेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली, त्याच वेळी आंदोलक रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि ट्रॅकवर उतरले. त्यामुळे सकाळपासूनच लोकलचा खोळंबा झाला. (Badlapur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.