Praja Report : विधानसभेचे कामकाज ४३ टक्क्यांनी घटले, महाराष्ट्र राज्य सातव्या क्रमांकावर

277
Praja Report : विधानसभेचे कामकाज ४३ टक्क्यांनी घटले, महाराष्ट्र राज्य सातव्या क्रमांकावर

प्रजा फाऊंडेशनच्या (Praja Report) वतीने मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक प्रकाशित केले असून यामध्ये “चालू १४व्या विधानसभेत कामकाजाचे दिवस कमालीचे घटले आहे, ही बाब या मूल्यमापनातून प्रकर्षाने समोर आली आहे. हिवाळी सत्र २०१९ ते अर्थसंकल्पीय सत्र २०२४ या वर्षभराच्या कालावधीत १४ व्या विधानसभेचे कामकाज केवळ ११९ दिवसच चालले. मात्र १२व्या विधानसभेचे कामकाज हे २१० दिवस होते. त्यामुळे चालू सत्रातील कामकाज दिवस ४३ टक्क्यांनी कमी असून देशातील विविध राज्यांच्या विधानसभांच्या कामकाज

दिवसांच्या तुलनात्मक श्रेणीमध्ये महाराष्ट्र राज्य सातव्या क्रमांकावर आले असल्याची बाब या अहवालातून अधोरेखित केली आहे. प्रजा फाऊंडेशनच्यावतीने (Praja Report) आमदारांच्या कामांचा अहवाल प्रकाशित केला असून या प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये अर्थसंकल्पीय सत्र २०२३ ते अर्थसंकल्पीय सत्र २०२४ या वर्षभराच्या कालावधीतील आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे. प्रजाने यावेळी मूल्यमापन प्रक्रिया अधिक व्यापक केली असून त्यामध्ये किमान तीन वर्षे सदस्य असलेल्या आमदारांच्या एकत्रित कामगिरीचे मूल्यांकन केले आहे आणि १४व्या विधानसभा सत्राची उत्पादनक्षमता, विशेषत: कामकाज दिवसांची संख्याही, तपासली असल्याचे जा फाऊंडेशनचे सीईओ मिलिंद म्हस्के यांनी स्पष्ट केले.

New Project 2024 08 20T204943.560

(हेही वाचा – Independent Candidates : येणाऱ्या विधानसभेत अपक्षांना सुगीचे दिवस?)

पाच आमदारांच्या गुणांची सरासरी ४८.१३ टक्के

“१४व्या विधानसभा सत्रातील आमदारांच्या एकत्रित कामगिरीचे चित्र मात्र चिंताजनक आहे. १३ व्या विधानसभा सत्राच्या तुलनेत चालू सत्रातील कामगिरी कमालीची खालावलेली आहे. हे वास्तव मागच्या काही वर्षात आपल्या राज्याने ज्या समस्यांचा सामना केल्या त्यांचा विचार करता अस्वस्थकारक आहे. सर्वात कमी गुण मिळालेल्या आमदारांची कामगिरी प्रकर्षाने खालावलेली आहे. १३व्या विधानसभेत निम्नतम गुण मिळवणाऱ्या पाच आमदारांच्या गुणांची सरासरी ४८.१३ टक्के होती, तर १४ व्या विधानसभेत ही सरासरी घटून ३४. ८१ टक्के एवढी आहे, यावरून कामगिरीचा दर्जा घसरलेला आहे असे त्यांनी म्हस्के यांनी केले,

आमदारांच्या कामगिरीवरून त्यांच्या संबंधित राजकीय पक्षांच्या कामगिरीचा विचार केला तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने सर्वाधिक ७२.५६ टक्के मिळवत प्रथम स्थान पटकावले आहे तर दुसऱ्या स्थानावर भाजपा पक्ष असून त्यांना ६०.०८ टक्के मिळाले आहे,असे म्हस्के यांनी नमुद केले. प्रमुख पक्षातील फुटी आणि बदलती राज्य सरकारे यांचा प्रतिकूल परिणाम इथल्या राजकीय समीकरणांवर आणि विधीमंडळातील कामकाजावार झालेला आहे. आगामी १५ व्या विधीमंडळ सभागृहामध्ये याचीच पुनरावृत्ती होणार नाही आणि कामकाज सुधारेल याची खबरदारी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे,” असे म्हस्के यांनी म्हटले. (Praja Report)

New Project 2024 08 20T205109.352

(हेही वाचा – Shivajirao Adhalrao Patil लवकरच घेणार वेगळा निर्णय ?)

प्रजाच्या अहवालात पहिले पाच आमदार
  • पहिला क्रमांक : अमिन पटेल, काँग्रेस
  • दुसरा क्रमांक : सुनील प्रभू, उबाठा शिवसेना श्रेणी
  • तिसरा क्रमांक : वर्षा गायकवाड, काँग्रेस
  • चौथा क्रमांक : मनिषा चौधरी, भाजपा
  • पाचवा क्रमांक : अस्लम शेख, काँग्रेस
प्रजाच्या अहवालातील शेवटच्या क्रमांकांमधील पाच आमदार
  • नबाव मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
  • सदानंद सरवणकर, शिवसेना
  • प्रकाश सुर्वे, शिवसेना
  • दिलीप लांडे, शिवसेना
  • राम कदम, भाजपा (Praja Report)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.