Women’s T20 World Cup 2024 : बांगलादेश नाही तर ‘या’ देशात होणार महिलांचा टी-२० विश्वचषक 

Women’s T20 World Cup 2024 : बांगलादेशातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे विश्वचषक स्पर्धा तिथून हलवण्यात आली आहे 

121
Women’s T20 World Cup 2024 : बांगलादेश नाही तर ‘या’ देशात होणार महिलांचा टी-२० विश्वचषक 
Women’s T20 World Cup 2024 : बांगलादेश नाही तर ‘या’ देशात होणार महिलांचा टी-२० विश्वचषक 
  • ऋजुता लुकतुके

महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशमधून हलवण्याचा कटू निर्णय अखेर आयसीसीने घेतला आहे. तिथल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे ही स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये भरवली जाईल. येत्या ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. बांगलादेशने तोपर्यंत सगळं काही ठिक होईल, असा दावा करत यजमानपद कायम ठेवण्याची विनंती आयसीसीला केली होती. पण, त्यांनी ती धुडकावून लावली. आधी भारताला स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. पण, भारताने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर आता युएईचा विचार करण्यात आला. तिथं दुबई, शारजा आणि आबूधाबी या तीन ठिकाणी सामने रंगणार आहेत. (Women’s T20 World Cup 2024)

युएईच्या शारजाह आणि दुबई या दोन ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत. महिला महिला टी-२० विश्वचषक २ ते २४ ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाणार आहे. (Women’s T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Badlapur School Case : माझी पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी; Supriya Sule यांनी केली सरकारकडे मागणी)

बांगलादेश सध्या अंतर्गत हिंसाचाराचा सामना करत आहे, जो विद्यार्थी अशांतता आणि राजकीय गोंधळाशी निगडीत आहे. हसीना शेख देश सोडून गेल्यानंतर, नवीन सरकार येऊनही अशांततेच्या बातम्या येत आहेत. बोर्डाच्या बैठकीदरम्यान अशा प्रकारच्या हिंसाचाराने प्रभावित झालेल्या देशात या वेळी स्पर्धा आयोजित करणे योग्य होणार नाही, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. (Women’s T20 World Cup 2024)

यापूर्वी, स्पर्धेचे यजमानपदासाठी संभाव्य देशांच्या यादीत भारताचे नाव देखील समाविष्ट केले गेले होते, परंतु बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी अलीकडेच सांगितले की मंडळाला महिला टी-२० विश्वचषक २०२४ चे आयोजन करण्यात रस नाही. (Women’s T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Vinesh Phogat : विनेश फोगाट राजकारणात उतरणार? बबिता फोगाटशी दोन हात?)

यूएईने २०२१ मधील आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकासह यापूर्वी अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. तिथे क्रिकेटच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ऐनवेळी यजमानपद मिळूनही तिथे स्पर्धा सुरळीत होऊ शकते, असा आयसीसीचा विचार आहे. (Women’s T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.