Bangladesh Cricket : बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ; संचालकांचा राजीनामा

Bangladesh Cricket : राजकारणातील अस्थिरता क्रिकेटमध्येही उतरली तर बंदी घालण्याचा विचार आयसीसी करू शकते 

94
Bangladesh Cricket : बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ; संचालकांचा राजीनामा
Bangladesh Cricket : बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ; संचालकांचा राजीनामा
  • ऋजुता लुकतुके

बांगलादेशमधील राजकीय अस्थिरतेचे पडसाद क्रिकेटमध्येही उमटायला लागले आहेत. बांगलादेश क्रिकेट मंडळ अर्थात, बीसीबीचे संचालक आणि क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष जलाल युनूस (Jalal Yunus) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. (Bangladesh Cricket)

(हेही वाचा- पुणे जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी Mangaldas Bandal यांना ईडीकडून अटक)

आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची पुष्टी करताना जलाल युनूस यांनी क्रिकबझला सांगितले की, “मी क्रिकेटच्या हितासाठी बोर्डाचा राजीनामा दिला आहे.” भविष्यात मंडळात बदल अपेक्षित आहेत. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन (Nazmul Hassan Papon) यांनीही क्रिकेटच्या हितासाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. (Bangladesh Cricket)

 गेल्या काही दिवसांपासून शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेट बोर्डाचे अनेक माजी अधिकारी आणि आयोजक नझमुलच्या नेतृत्वाखालील बोर्ड पॅनेलच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अलीकडेच अंतरिम सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ महमूद यांनी बीसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. (Bangladesh Cricket)

आयसीसी फ्रेमवर्क अंतर्गत बोर्ड अंतरिम प्रमुखाची नियुक्ती करू शकते की नाही यावर चर्चा केली. सध्याच्या बोर्डाचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२५ मध्ये संपत आहे, नुकतीच बांगलादेशमध्ये होणारी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा आयसीसीने दुसरीकडे हलवली आहे. आता सरकारी हस्तक्षेप वाढला तर आयसीसी बीसीबीच्या सदस्यत्वावर बंदी घालू शकते. (Bangladesh Cricket)

(हेही वाचा- Raksha Bandhan : राखी भावांना, फायदा पोस्ट खात्याला)

बांगलादेशचा पुरुष क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. तिथे हा संघ एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. २१ ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना २१ ते २५ ऑगस्ट दरम्यान रावळपिंडी येथे होणार आहे. तर दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना रावळपिंडीत ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. (Bangladesh Cricket)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.