राखी पौर्णिमेनिमित्त (Raksha Bandhan) लाडक्या भाऊरायाला वेळेत राखी पोहोचावी, यासाठी बहिणींनी यंदाही टपाल खात्याच्या (indian post) सेवेला पसंती दिली. भावा-बहिणींच्या या रेशीमबंधासाठी देशातच नव्हे, तर परदेशातही राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्टचा वापर करण्यात आला. टपाल कार्यालयाने यामुळे या कालावधीत बऱ्यापैकी कमाई केली. कुरिअर सेवांमुळे टपाल खात्यापुढे आव्हान उभे राहिले असले तरी टपाल खात्याचे वेगळेपण कायम टिकून आहे.
(हेही वाचा – पुणे जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी Mangaldas Bandal यांना ईडीकडून अटक)
दरवर्षी स्पीड पोस्ट, रजिस्टर आणि साध्या टपाल सेवेतून येणाऱ्या राख्यांचे वितरण वाटप करण्यात येते. भावा-बहिणीच्या नात्यात आणखी गोडवा आणण्यासाठी रंगीबेरंगी पाकिटांसह, वॉटरप्रूफ कव्हर्स पोस्ट कार्यालयात उपलब्ध होते. टपाल कार्यालयात राख्या खोळंबून राहू नयेत, यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. पाकिटे वेगळी करण्याचा वेळ वाचविण्यासाठी वेगळ्या पिशव्या तयार करण्यात आल्या होत्या. देश-विदेशातही पाठविल्या राख्या पाठविण्यासाठी स्पीड पोस्टचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
माफक दरात टपाल कार्यालयामार्फत सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. देश-विदेशातही पोस्टाच्या माध्यमातून राख्या पाठविण्यात आल्या. राखी पोहोचविण्यासाठी विशेष काळजी राखी पौर्णिमा हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा आहे. ज्यात भावनिक ओढ आहे. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभागामार्फत विशेष काळजी घेतली जाते. भाऊ-बहिणींच्या नात्याची वीण घट्ट करणारी राखी वेळेत पोहोचविण्यासाठी टपाल खात्याकडून विशेष व्यवस्था केली जाते. त्या भावाला राखी वेळेत मिळते, तसेच पोस्ट खात्याच्या आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळते. (Raksha Bandhan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community