Yuvraj Singh Biopic : युवराजवर ‘सिक्सर किंग’ या बायोपिकची घोषणा, कोण करणार युवराजची भूमिका?

Yuvraj Singh Biopic : तरण आदर्श यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे 

99
Yuvraj Singh Biopic : युवराजवर ‘सिक्सर किंग’ या बायोपिकची घोषणा, कोण करणार युवराजची भूमिका?
Yuvraj Singh Biopic : युवराजवर ‘सिक्सर किंग’ या बायोपिकची घोषणा, कोण करणार युवराजची भूमिका?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी शैलीदार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या (Yuvraj Singh Biopic) चाहत्यांना आता युवराज सिंगचा आजवरचा प्रवास ७० एमएम पडद्यावर पाहता येणार आहे. त्याच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची घोषणा करण्यात आली असून  तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा- Bangladesh Cricket : बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ; संचालकांचा राजीनामा)

युवराज सिंगच्या आधी महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि कपिल देव यांच्या बायोपिक बनल्या आहेत. आता आणखी एका स्टार क्रिकेटपटूवर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूषण कुमार – रवी भागचंदका या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. (Yuvraj Singh Biopic)

 मोहम्मद कैफच्या (Mohammad Kaif) नेतृत्वाखाली २००० साली १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघातील युवराज हा सर्वोच्च कामगिरी करणारा खेळाडू होता. २०३ धावा आणि १२ बळी मिळवून युवराज तेव्हा मालिकावीर ठरला होता. यानंतर युवराज सिंगने आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. (Yuvraj Singh Biopic)

२०११ मध्ये जेव्हा भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला तेव्हाही युवराज सिंगला मॅन ऑफ द टूर्नामेंट निवडण्यात आले. याशिवाय युवराज सिंगने २००७ च्या टी-२० विश्वचषकात आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताच्या विजेतेपदात मोठी भूमिका निभावली होती. या स्पर्धेत त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) एकाच षटकात ६ षटकार मारून विक्रम केला होता. (Yuvraj Singh Biopic)

(हेही वाचा- Happy Janmashtami : श्रीकृष्ण जन्माष्टमीला ‘या’ शुभेच्छांचा होईल उपयोग)

युवराज सिंगने भारतासाठी ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८  टी-२० सामने खेळले आहेत. युवराज सिंगने कसोटीत एकूण १,९०० धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी, एकदिवसीय सामन्यांमध्ये युवराजने एकूण ८,७०१ धावा केल्या आहेत, ज्यात १४ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय युवराज सिंगने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १,१७७ धावा केल्या आहेत. (Yuvraj Singh Biopic)

२०११ मध्ये युवराज सिंगला कर्करोगाचं निदान झालं. पण, त्यावर यशस्वी मात करून लगेचच २०१२ मध्ये तो क्रिकेटच्या मैदानावर परतला होता. यानंतर युवराज सिंगच्या कॅन्सरवर बोस्टन आणि इंडियानापोलिसमध्ये उपचार करण्यात आले. (Yuvraj Singh Biopic)

(हेही वाचा- Badlapur School Case : आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी)

या बायोपिकमध्ये युवराज सिंगची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही, मात्र चित्रपटात युवराज सिंगची भूमिका सिद्धांत चतुर्वेदी साकारू शकतो, असे मानले जात आहे. युवराज सिंगने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की, जर त्याच्यावर बायोपिक बनवला गेला तर त्याची भूमिका सिद्धांत चतुर्वेदीने साकारावी अशी त्याची इच्छा आहे. आता यासाठी सिद्धांत चतुर्वेदीला ऑफर दिली जाते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. इनसाइड एज या क्रिकेटवर आधारित वेब सीरिजमध्ये सिद्धांतने क्रिकेटरची भूमिका साकारली होती. (Yuvraj Singh Biopic)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.