Happy Janmashtami : श्रीकृष्ण जन्माष्टमीला ‘या’ शुभेच्छांचा होईल उपयोग

150

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म (Happy Janmashtami) झाला असे मानले जाते. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. दरवर्षी या तिथीबाबत संभ्रम निर्माण होऊन जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते. श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत. पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करतात. या श्रीकृष्ण जन्माष्टमीला (Happy Janmashtami) आप्तस्वकीयांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश.

“मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता
ते आहेत नंदलालचे गोपाला
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा
मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!”

(हेही वाचा Badlapur School Case : बदलापूर आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू, विविध पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल)

“कृष्ण मुरारी नटखट भारी
माखनचोर जन्मला
रोहिनी नक्षत्राला
देवकी नंदाघरी
बाळ तान्हे तेजस्वी
मोहूनी घेती
सर्व मिळूनी पाळणा गाती
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!” (Happy Janmashtami)

“गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!” (Happy Janmashtami)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.