उत्सवात डीजे, लेझर लाईट वापरावरील बंदीची मागणी Bombay High Court ने फेटाळली

125

सण आणि उत्सवांत मिरवणुकीसह इतर समारंभासाठी लेझर बीम, कर्णकर्कर्श डीजेचा सर्रास वापर करण्याला बंदी आणावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जनहित याचिकेद्वारे केली होती. उत्सवांतील लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम झाला असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळून लावली आहे.

सण-उत्सवांत मोठ्या प्रमाणात होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात सरकारी यंत्रणा सकृतदर्शनी अपयशी ठरल्याचे पुरावे याचिकाकर्ते सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे या आदेशांच्या उल्लंघनाप्रकरणी चौकशीची मागणी केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने (Bombay High Court)  नमूद केले आहे.

(हेही वाचा ‘The Diary of West Bengal’ चित्रपटाने मांडले पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या भीषण दुःस्थितीचे वास्तव)

लेझर बीमच्या नियमनासाठी अद्यापपर्यंत कोणतीही विशिष्ट कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक मेळाव्यांत आणि कार्यक्रमांमध्ये लेझर बीमच्या वापरावरील नियमनासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या मागणीकरिता राज्य सरकारच्या योग्य प्राधिकरणाकडे तपशीलवार निवेदन सादर करण्याची याचिकाकर्त्यांना मुभा आहे, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढताना प्रामुख्याने स्पष्ट केले.मानवी जीवन किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात येईल, असे अविचारी किंवा निष्काळजी कृत्य करून कोणी दुसऱ्याला गंभीर दुखापत करत असेल, तर त्याबाबत याचिकाकर्ते नव्याने लागू केलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ किंवा अन्य कलमानुसार कारवाईची मागणी करू शकतात. त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही न्यायालयाने (Bombay High Court) उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.