BJP चा विधानसभेसाठी मेगा प्लॅन; सोशल इंजिनिअरिंग साधत ‘या’ चार नेत्यांवर मोठी जबाबदारी

153
काँग्रेसच्या आरोपांना BJP चे सडेतोड उत्तर

राज्यात नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मेगा प्लॅन आखला असल्याची चर्चा समोर आली आहे. यासाठी भाजपाने (BJP) चार नेत्यांची निवड केली आहे. मराठा मतदार, ओबीसी मतदार आणि दलित-आदिवासी मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपाकडून नवी रणनिती आखली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने चांगलीच कंबर कसली आहे.

(हेही वाचा – ‘मिशन काश्मीर’ जिंकण्यासाठी BJP ची योजना; संघाचे राम माधव पुन्हा मैदानात)

सोशल इंजिनिअरिंग साधणार…

लोकसभेत भाजपाला राज्यात मोठा फटका बसला, तो विधानसभेत बसू नये म्हणून भाजपाने आतापासून काळजी करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून भाजपाचं (BJP) आता सोशल इंजिनिअरिंग सुरू झालं आहे. याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चार नेते महाराष्ट्रात काम करणार आहेत. या चार नेत्यांच्या यात्रा आणि सभा महाराष्ट्रात लवकरच होणार आहे. यातच पंकजा मुंडे, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांवर मुख्य जबाबदारी दिली जाणार आहे. मराठा तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असतांना भाजपाकडून आता वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

(हेही वाचा – Badlapur School Case प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रीय अध्यक्ष ठरणार

दरम्यान, जे. पी. नड्डा यांना राज्यसभेवर घेतल्यानंतर भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. यातच कधी देवेंद्र फडणवीस, तसेच विनोद तावडे यांचंही नाव चर्चेत आलं आहे. यातच आता धर्मेंद्र प्रधान आणि भुपेंद्र यादव यांचाही विचार भाजपाकडून सुरू आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया भाजपाकडून (BJP) केली जाणार आहे. तोपर्यंत जे.पी. नड्डा यांच्याकडेच अध्यक्षपदाची सुत्र राहणार आहे. नवे अध्यक्ष २०२५ च्या जानेवारीत आपला पदभार स्विकारणार असल्याचीही माहिती समोर आलीय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.