Water Crisis : बोरिवली, कांदिवलीतील जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून काढा, महापालिका आयुक्तांचे निर्देश

2503
Water Crisis : बोरिवली, कांदिवलीतील जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून काढा, महापालिका आयुक्तांचे निर्देश

बोरिवली, कांदिवली येथील रहिवाशांना अखंड, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करा. ज्या ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत, त्यांचे तत्काळ निरसन करा. जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून काढा, गळती शोधून काढण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी दिले. (Water Crisis)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी (२१ ऑगस्ट २०२४) बोरिवली, कांदिवली या परिसराला भेट देत विविध विकास कामांची पाहणी केली. प्रारंभी, कांदिवली (पश्चिम) येथील आर दक्षिण विभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत महानगरपालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा, वाहतूक व प्रकल्पबाधित नागरिकांचे पुनर्वसन या विषयांवर अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. उप आयुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (आर मध्य) संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त (आर उत्तर) नयनीश वेंगुर्लेकर, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी आदी यावेळी उपस्थित होते. (Water Crisis)

(हेही वाचा – PM Modi Poland and Ukraine Visit: पंतप्रधान मोदी ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच पोलंड दौऱ्यावर)

चारकोप, देवीपाडा, एकसर या ठिकाणी होणाऱ्या दूषित पाण्याचा पुरवठा बंद झाल्याबाबत समाधान व्यक्त करत आर मध्य, आर दक्षिण आणि आर उत्तर विभागातील पाणीपुरवठ्याचा आढावा आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी घेतला. लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्याबाबत केलेल्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, पाणीविषयक सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा निपटारा योग्य वेळेतच करावा, असे निर्देशही महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले. (Water Crisis)

रस्ते बाधित, प्रकल्पबाधित नागरिकांचे आहे त्याच विभागात, परिमंडळात पुनर्वसन करावे, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. घरकुलांची उपलब्धता आणि बाधितांची संख्या यांची सविस्तर माहिती घ्यावी, असेही निर्देश गगराणी यांनी बैठकीत दिले. बैठकीनंतर महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी वरिष्ठ अधिकाऱयांसमवेत राजेंद्र नगर उड्डाणपुलास भेट देऊन नियोजित जोड रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर, कांदिवली (पूर्व) येथील आकुर्ली छेद रस्ता येथील क्षमता बांधणी केंद्र, आशोक चक्रवती मार्गावरील प्रस्तावित नागरी सुविधा केंद्र आदींची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. तसेच आवश्यक ते निर्देश दिले. (Water Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.