बदलापूर (Badlapur) येथील शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या तपासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले आहे. या एसआयटीच्या प्रमुख आयपीएस महिला अधिकारी आरती सिंग यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास सुरू केला असून सिंग यांनी पीडिताच्या घरी भेट देऊन पीडितेच्या आईचा जबाब नोंदवून घेतला आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे एक अधिकारी, दोन पोलीस निरीक्षक, एक महिला पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस अंमलदार यांचे पथक असणार आहे. (Badlapur Sexual Assault Case)
(हेही वाचा – Sanjay Shirsat यांची टीका; म्हणाले सुप्रिया सुळे या…)
बदलापूर (Badlapur) येथील आदर्श विद्यालय या प्रतिष्ठित शाळेत गेल्या आठवड्यात ४ वर्षांच्या दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केला होता. दोन दिवसांनी हा प्रकार समोर आल्यानंतर पीडिताचे कुटुंबीय स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांकडून पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांना तब्बल १२ तास थांबवून ठेवले होते. गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून झालेला विलंब आणि शाळेत मुलीवर झालेल्या अत्याचार या घटनेमुळे संतप्त बदलापूर करांनी मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करून १० तास रेल्वे प्रशासन आणि रेल्वे प्रवाशांना वेठीस धरण्यात आले होते. (Badlapur Sexual Assault Case)
(हेही वाचा – Badlapur School Case: बदलापूरच्या ‘त्या’ घटनेनंतर सरकारने शाळांसाठी काढला ‘जीआर’)
या आंदोलनानंतर राज्य शासनाकडून लैंगिक अत्याचाराचा (sexual assault) तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापन करण्याचे आदेश देऊन हा गुन्हा जलद न्यायालयात चालविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात जेष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) तयार करण्यात आले आहे. या पथकात सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे एक अधिकारी, दोन पोलीस निरीक्षक, एक महिला पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस अंमलदार असे विशेष पथकात असणार आहेत. विशेष तपास पथकाने बुधवारी या गुन्ह्याचा तपास हाती घेऊन दोन्ही पीडितेच्या घरी भेट देऊन, पीडितेच्या आईचा जबाब नोंदवून घेतला आहे. या गुन्ह्याचा तपासाचा अहवाल एसआयटी कडून लवकरात तयार करून गृह विभागाकडे सोपविण्यात येणार आहे. (Badlapur Sexual Assault Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community