Andhra Pradesh Explosion : आंध्र प्रदेशच्या फार्मा कंपनीतील भीषण स्फोटात १५ जणांचा मृत्यू

112
Andhra Pradesh Explosion : आंध्र प्रदेशच्या फार्मा कंपनीतील भीषण स्फोटात १५ जणांचा मृत्यू
Andhra Pradesh Explosion : आंध्र प्रदेशच्या फार्मा कंपनीतील भीषण स्फोटात १५ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh Explosion) अनकापल्ले जिल्ह्यामध्ये असलेल्या एका फार्मा कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. अनकापल्ले जिल्ह्यातील एस्सियंटिया या फार्मास्युटिकल कंपनीत बुधवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी भीषण स्फोट होऊन १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत ४० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांकडून मदत कार्य सुरु असून कंपनीत अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Indian Navy MoU: भारतीय नौदलाचा बीईएमएल कंपनीशी सामंजस्य करार)

दुपारच्या जेवणावेळी कंपनीतील काही कामगार जेवणासाठी बाहेर गेले होते. त् यावेळी ही घटना घडल्याने अनेकांचा जीव बचावला आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळावर तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या कामगारांवर उपचार सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

परिसरात राखाडी धुराचे मोठमोठे लोट

एस्सियंटिया या फार्मास्युटिकल कंपनीत आधी भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली. भीषण स्फोटाची घटना घडल्यानंतर कंपनीच्या परिसरात राखाडी धुराचे मोठमोठे लोट पसरले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. तसेच आपला जीव वाचवण्यासाठी कामगारांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली आहे. सध्या कंपनीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Andhra Pradesh Explosion)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.