मुंबईतील रुग्णांची संख्या गुरुवारच्या तुलनेत अधिक वाढली आहे. गुरुवारी जिथे ६६६ एवढे रुग्ण आढळून आले होते, तिथे शुक्रवारी दिवसभरात ७६२ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात एकूण ३० हजार ४४७ चाचण्या करण्यात आल्या असून, १९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी अधिक होताना दिसत आहे.
अशी आहे आकडेवारी
गुरुवारी, बुधवारच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी होऊन ६६६ एवढी झाली होती. पण शुक्रवारी ही संख्या पुन्हा वाढून ७६२ एवढी झाली. दिवसभरात ६८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारपर्यंत एकूण १४ हजार ८६० रुग्णांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. गुरुवारी जिथे २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथे शुक्रवारी १९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये १४ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे असून, यात ११ पुरुष आणि ८ महिला रुग्णांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील ८ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ११ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
१८ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ७६२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ६८४
बरे झालेले एकूण रुग्ण – ६८७५५०
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १४८६०
दुप्पटीचा दर- ७३४ दिवस
कोविड वाढीचा दर ( ११ जून ते १७ जून)- ०.०९ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 18, 2021
(हेही वाचाः पुढचा आठवडा मुंबईकरांसाठी धोक्याचा… काय आहे कारण?)
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ७३४ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८५ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या १८ एवढी आहे.
धारावीत अवघे पाच रुग्ण
जागतिक स्तरावर ज्या धारावीतील कोविड रुग्णांची आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांची दखल घेतली गेली, त्या धारावीमध्ये एकूण पाचंच रुग्ण असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. शुक्रवारी धारावीमध्ये १ रुग्ण आढळून आला. परंतु आतापर्यंत धारावीमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ही केवळ पाच एवढी आहे. त्यामुळे धारावी पूर्णत: शून्याच्या जवळ येऊन पोहोचली आहे. जी-उत्तर विभागातील धारावीसह माहिम आणि दादरमध्ये शुक्रवारी एकूण ८ रुग्ण आढळून आले. यामध्ये माहिममध्ये ५ आणि दादरमध्ये ०२ रुग्ण आढळून आले. या दोन्ही भागांमध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या अनुक्रमे ९४ आणि १३१ एवढी आहे. त्यामुळे धारावी, माहिम आणि दादरमध्ये एकूण २३० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
(हेही वाचाः मुंबईकरांना ‘फुकट’ नको, ‘विकत’ हवी… खासगी केंद्रांवरील लसीकरण जोरात)
Join Our WhatsApp Community