- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट जगात उच्च पदावर असलेल्या व्यक्तींमध्ये गुगलचे सत्या नाडेला यांच्या जोडीने घ्यावं लागेल असं एक भारतीय नाव आहे लक्ष्मण नरसिंहम. स्टारबक्स या आंतरराष्ट्रीय ब्रँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची निवड झाल्यावर या अमेरिकन – भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याचं नाव पहिल्यांदा जगभर झालं. अलीकडेच त्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं ते त्यांनी स्टारबक्स सोडल्यामुळे. त्यांच्या जागी आता चिपोटले कंपनीचे सीईओ ब्रायन निकोल रुजू होत आहेत. (Laxman Narasimhan Net Worth)
(हेही वाचा- …तोपर्यंत तुम्ही गांभीर्याने घेणारच नाही का? बलात्कार प्रकरणावरून Bombay High Court ची सरकारवर आगपाखड)
नरसिंहम यांच्या कारकीर्दीचा पहिला मोठा पाडाव होता तो पेप्सिको कंपनीचे सीसीओ झाल्यावर. तिथपासून त्यांची कारकीर्द चढीच राहिली आहे. लोकप्रिय सीईओ अशी त्यांची ओळख आहे. त्यांची बहुतांश मालमत्ता ही त्यांना मिळालेला पगार आणि शेअर बाजारात त्यांनी केलेली गुंतवणूक यातून येते. (Laxman Narasimhan Net Worth)
स्टारबक्सचे सीईओ म्हणून त्यांना वार्षिक १.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका मोबदला मिळत होता. त्याचवेळी रेकिट बेंकायझर कंपनीचे संचालक म्हणूनही त्यांना वर्षाला ४५ लाख अमेरिन डॉलर मिळतात. त्याचबरोबर पेप्सिको कंपनीचे १,३०,१३५ शेअर त्यांच्याकडे आहेत. त्यांची किंमतही या घडीला २२ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे. लक्ष्मण नरसिंहम यांची ३० वर्षांची यशस्वी कारकीर्द आहे. (Laxman Narasimhan Net Worth)
(हेही वाचा- Bomb Threat : मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी)
५७ वर्षीय नरसिंहम अमेरिकेत वॉर्टन विद्यापीठातून एमबीए झाल्यावर त्यांनी यशस्वी व्यवस्थापक म्हणून आपली कारकीर्द घडवली आहे. केनेक्टीकट इथं ते राहतात. पेप्सिको कंपनीचे सीईओ म्हणून ते पहिल्यांदा लोकांच्या नजरेसमोर आले. त्यानंतर स्टारबक्स या सियाटलस्थित कंपनीचा विस्तार करताना त्यांनी निभावलेली भूमिका मोलाची मानली जाते. कंपनीची पुरवठा साखळी सक्षम करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी ते ओळखले जातात. लॅटिन अमेरका, युरोप, आफ्रिकन देश इथं त्यांनी स्टारबक्सचा प्रसार केला. (Laxman Narasimhan Net Worth)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community