Kolkata Rape Case मध्ये नवा ट्विस्ट! आरोपी संजय रॉयचा सहाय्यक पोलीस निरिक्षकासोबतचा सेल्फी व्हायरल

194
Kolkata Rape Case मध्ये नवा ट्विस्ट! आरोपी संजय रॉयचा सहाय्यक पोलीस निरिक्षकासोबतचा सेल्फी व्हायरल
Kolkata Rape Case मध्ये नवा ट्विस्ट! आरोपी संजय रॉयचा सहाय्यक पोलीस निरिक्षकासोबतचा सेल्फी व्हायरल

कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे (Kolkata Rape Case) संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ९ ऑगस्टला घडलेल्या या घटनेनंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध, आंदोलनं होतं आहेत. याप्रकरणातील तरुणीला न्याय मिळण्याकरिता अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पीडितेच्या पालकांनी ज्या पद्धतीने त्यांच्या मुलीवर अत्याचार झाले आहेत ते पाहता हे कोणत्या एका व्यक्तीचं काम नाही असं म्हणत यामध्ये इतरही लोकांचा समावेश असणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. संजय रॉयची (Sanjay Roy) चौकशी केली जात असतानाच त्याची पॉलिग्राफी चाचणी होण्याचीही शक्यात व्यक्त केली जात आहे. सीबीआयच्या रडारवर आता संजयबरोबरच इतरही अनेक लोक आहेत. विशेष म्हणजे यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. (Kolkata Rape Case)

(हेही वाचा –Bomb Threat : मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी)

20 ऑगस्ट रोजी सीबीआयने संजय रॉयचा निकटवर्तीय असलेला सहाय्यक पोलीस निरिक्षक (एएसआय) अरूप दत्ता (Arup Dutta) यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. सोशल मीडियावर याच अरूप दत्ता यांचा प्रसारमाध्यमांपासून पळ काढत सीबीआयच्या कार्यालयामध्ये धावत जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच अरूप दत्ता यांची नव्याने चर्चा सुरु होण्याचं कारण म्हणजे त्यांचा आरोपी संजय रॉयबरोबरचा एक सेल्फी व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन संजय रॉय आणि अरूप दत्ता यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा दावा केला जात आहे. हा सेल्फी आरोपी संजय रॉयने काढल्याचं फोटो पाहिल्यावर स्पष्ट होत आहे. (Kolkata Rape Case)

(हेही वाचा –Nagpur Crime: ‘चल तुला चॉकलेट देतो’, असं सांगुन शेजाऱ्याकडून मुलीवर अत्याचार!)

एएसआय अरूप दत्ता यांची सीबीआयने आठ तास चौकशी केली. त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाण्याची दाट शक्यता आहे. आरोपी संजय रॉयबरोबर तुमचा काय संबंध आहे? तुम्ही संजय रॉयला रुग्णालयामध्ये जवळपास सर्वच विभागांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी कोणत्या आधारे आणि नेमकी कशासाठी दिली होती? गुन्हा घडल्याचं कधी कळलं? असे प्रश्न सीबीआयने अरूप दत्ता यांना विचारले. (Kolkata Rape Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.