गेले ३ दिवस MPSC चे विद्यार्थी पुण्यात (Pune) आंदोलन करत आहेत. २१ ऑगस्टच्या रात्रीच शरद पवार गटाचे रोहित पवार यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने 25 ऑगस्ट 2024 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परीक्षेची पुढची दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Hindusthan Post impact : दादरच्या ‘त्या’ रस्त्याचे काम तोडून नव्याने बनवण्यास सुरुवात)
काय आहे प्रकरण ?
तीन दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत होते. मंगळवार रात्रीपासून हे विद्यार्थी पुण्यातील नवी पेठेतील शास्त्री रोडवर आंदोलन करत होते. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसची परीक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी, तसेच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची होती.
माध्यमांनी या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर हळूहळू राजकीय नेते आंदोलस्थळी येऊ लागले होते. २२ ऑगस्ट रोजी शरद पवार MPSC च्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणार अशी चर्चा होती. आमदार रोहित पवारदेखील या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले होते.
दरम्यान, प्रशासन आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे शांतता राखा, असे आवाहन पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community