Waqf Board : विधेयकाला काँग्रेसचा विरोध म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

147
Waqf Board Law वर चर्चा करण्यासाठी २६ तारखेपासून ५ राज्यांमध्ये बैठक

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार सच्चर आयोगाच्या शिफारसींनुसारच वक्फ बोर्ड (Waqf Board) सुधारणा विधेयक आणण्यात आले आहे. या विधेयकाला काँग्रेसचा विरोध म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी काँग्रेसवर केला आहे. वक्फ बोर्डाच्या नव्या सुधारणा विधेयकात मुस्लिम समाजाच्या विकासासाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अल्पसंख्यांक सुमुदायातही काही अपेक्षित घटक आहेत. त्यांच्यासह मुस्लिम महिलानांही वक्फ बोर्डात प्रतिनिधित्व मिळतंय ही जमेची बाजू आहे. पण विरोधक केवळ मुस्लिम समाजाची दिशाभूल करत आहेत. आपल्या देशात संविधान सर्वात मोठं आहे, त्यापेक्षा कोणतीही संस्था मोठी नाही. वक्फ बोर्डाच्या कार्यवाही आता थेट संविधानाच्या कक्षेत येत असेल तर त्यात वावगं काहीही नाही.

(हेही वाचा – MPSC परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; आंदोलक विद्यार्थ्यांना दिलासा)

मुस्लिम समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या काळातच सच्चर आयोगाने काही शिफारसी केल्या होत्या, याच अनुषंगाने विधेयक (Waqf Board) तयार करण्यात आलंय. काँग्रेसने सांगावं की, सच्चर आयोगचं खोटा आहे. शरद पवार यांच्या सारखे ज्येष्ठ नेतेही संवेदनशील विषयवार राजकारण करतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पवारांना त्यांच्या मुलीला राज्याचे मुख्यमंत्री करायचे आहे, त्यातून हे राजकारण होतंय. पवार साहेब मुख्यमंत्री असतानाही अनेक घटना घडल्या आहेत, अनेक आंदोलने झाली आहेत याचीही माहिती सुप्रिया सुळे यांनी घ्यावी.

(हेही वाचा – Kolkata Rape Case मध्ये नवा ट्विस्ट! आरोपी संजय रॉयचा सहाय्यक पोलीस निरिक्षकासोबतचा सेल्फी व्हायरल)

संजय राऊत यांचा रात्रीचा थर्रा सकाळी उतरला नसेल म्हणून ते काहीही बरळत आहेत. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या मतदारसंघाचा भाग बदलापूर आहे, ही साधी माहितीही राऊत यांना नाही. उगाच काहीही बोलून विरोध करायचा हा राऊत यांचा दिनक्रम झालाय. ते म्हणाले की, बदलापूरला संवेदनशील घटना घडली असताना विरोधकांनी षडयंत्र करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. गाड्या भरून बाहेरून माणसं आणली गेली. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कामामुळे प्रचंड लोकप्रियता मिळत आहे, ते विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय त्यामुळेच असे प्रकार घडवले जात आहेत. (Waqf Board)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.