राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ विविध उपाय योजना करत असतात. आणि त्या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा ही होत असतो. अशातच २०२३ रोजी शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ (Namo Shetkari Mahasanman Yojana) सुरू केली. आता या योजनेचा चौथा आणि पाचवा हफ्ता सप्टेंबर महिन्याच्या २ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. (Namo Shetkari Mahasanman Yojana)
तब्बल चार लाख ५९ हजार ३१७ लाभार्थी शेतकरी
पी. एम. किसानच्या (P.M. Kisan Yojnana) धर्तीवर राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान योजना (Namo Shetkari Mahasanman Yojana) सुरू केली आहे. जिल्ह्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचे चार लाख ५९ हजार ३१७ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दोन सप्टेंबरपर्यंत चौथा आणि पाचवा हप्ता देण्यासाठी शासनाने तयारी केली आहे. अशी माहिती कृषी खात्यातील (Agriculture Department) सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील वंचित १६९१ आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर अपडेट करण्याचे काम सुरू आहे.
(हेही वाचा – Kolkata Doctor Murder Case: संजय रॉयचे सायको ॲनालिटिकल प्रोफाइल आलं समोर; कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही)
गौरी गणपतीच्या सणाला पैसे उपलब्ध होणार
चौथा आणि पाचवा हप्ता (Farmer Fourth and fifth installments) मिळवून चार हजार रुपयींप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १८३७ कोटी सत्तावीस लाख रुपये मिळणार आहेत. यामुळे गौरी गणपतीच्या सणाला (Festivals of Gauri Ganapati) खर्चाला पैसे उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, केंद्र शासनाच्या वतीने ९ ऑगस्ट २०२४ रोजीच्या दुरदृश्य प्रणालीद्वारे पी. एम. किसानचा लाभ न मिळालेल्या वंचित १६९१ शेतकऱ्यांना मोबाईल लिंक ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अपडेटमुळे नमो सन्मान योजनाचाही हप्ता वंचित लाभार्थ्यां ना प्राप्त होणार आहे. (Namo Shetkari Mahasanman Yojana)
हेही पाहा –