Kolhapur Murder Case: कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापूर हादरलं; १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

303
Kolhapur Murder Case: कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापूर हादरलं; १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या
Kolhapur Murder Case: कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापूर हादरलं; १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

डॉक्टर तरुणीवरील बलात्कार (Kolkata Dr Rape Case) आणि हत्येने कोलकाता पेटलेले असतानाच, बदलापूरसह (Badlapur School Case) कोल्हापूर सुद्धा या भीषण घटनेने हादरलं आहे. हे दोन्ही प्रकरण ताजी असताना कोल्हापूरातून धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापूरच्या शियेमध्ये १० वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेपूर्वी पीडित मुलगी बुधवारी (२१ ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. (Kolhapur Murder Case)

संबंधित पीडित तरुणी ही मुळची बिहार इथली असून, ती आपल्या आई आणि वडील आणि पाच भावंडांसह कोल्हापूर येथील रामनगर (Kolhapur Ram Nagar) परिसरात राहत होती. या मुलीचे आई वडील शिरोली येथील एमआयडीसी (Shiroli MIDC) येथे मजूर म्हणून कामाला होते. पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार बुधवार (२१ ऑगस्ट) सायंकाळी शिरोली येथील एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार केली होती. 

(हेही वाचा – cisf salary : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला मिळतो ’इतका’ पगार)

यानंतर कोल्हापूर पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर येथील एका छोट्या शेडमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. यावेळी प्राथमिक माहितीनुसार, मुलीच्या अंगवर ड्रेस होता, पण बाजूला फक्त चप्पल व अंतवस्त्र दिसत होते. पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयिताला अटक करण्यात आले आहे.

दरम्यान, मुलीवर अत्याचार झाल्याचा संशयही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपासानंतरच निष्कर्ष काढला जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. फॉरेन्सिक टीमला पाचारण केले असून पुढील तपास सुरू आहे.  (Kolhapur Murder Case)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.