Zomato to Buy Paytm : झोमॅटो खरेदी करणार पेटीएमचा तिकीट विक्री व्यवसाय

Zomato to Buy Paytm : २,०४८ कोटी रुपयांचा हा करार असल्याचं बोललं जातंय.

114
Zomato to Buy Paytm : झोमॅटो खरेदी करणार पेटीएमचा तिकीट विक्री व्यवसाय

खाद्यपदार्थ हॉटेलमधून घरपोच ग्राहकांपर्यत पोहोचवणारी कंपनी झोमॅटो (Zomato) आता सिनेमाची तिकिटंही घरपोच देऊ शकते. कंपनीने पेटीएम या फिनटेक कंपनीशी एक करार केला आहे. त्यानुसार, पेटीएमचा मनोरंजन क्षेत्रातील तिकीट विक्रीचा व्यवसाय झोमॅटो खरेदी करणार आहे. हा व्यवहार सुमारे २,०४८ कोटी रुपयांचा असल्याचं समजतंय. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सनं बुधवारी एक्सेंज फायलिंगमध्ये या निर्णयाची माहिती दिली. तिकीट विक्री व्यवसायातून बाहेर पडल्यानं पेटीएम आता पेमेंट आणि वित्तीय सेवा व्यवसायात पूर्णपणे लक्ष देणार आहे. (Zomato to Buy Paytm)

(हेही वाचा – NITI Aayog कडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर)

झोमॅटोच्या (Zomato) सोबत डीलची घोषणा झाल्यानंतर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी शेअरधारकांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी आम्ही आता आमच्या मूळ व्यवसायात लक्ष देऊन नफा मिळवून देणारं मॉडेल तयार करण्यावर लक्ष देणार असल्याचं म्हटलं. पेटीएमसाठी आम्ही दीर्घकालीन योजना तयार केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आव्हानांचा सामना केला आहे. आता आम्ही त्या धक्क्यांमधून सावरलो असून यातून पुढं जायची तयारी करतोय, असं विजय शेखर शर्मा म्हणाले. (Zomato to Buy Paytm)

(हेही वाचा – Namo Shetkari Mahasanman Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! चौथा आणि पाचवा हफ्ता ‘या’ तारखेला मिळण्याची शक्यता)

वन 97 कम्युनिकेशन्सनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं की ते पेटीएम इनसायडरची १०० टक्के हिस्सेदारी झोमॅटोला विकणार आहे. पेटीएमच्या मनोरंजन क्षेत्रातील तिकीट विक्रीचं काम करणाऱ्या टीमच्या २८० कर्मचाऱ्यांना देखील झोमॅटोला वर्ग केलं जाईल. पेटीएम इनसायडरद्वारे सिनेमा, स्पोर्टस आणि कार्यक्रमांच्या तिकिटांची विक्री केली जाते. ही सेवा पुढील १२ महिने सुरु राहील. (Zomato to Buy Paytm)


हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.