Cristiano Ronaldo : फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा युट्यूब चॅनलवरही विक्रम

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या चॅनलला ४ तासांत ५० लाख फॉलोअर्स.

78
Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रमी ९०० वा गोल
  • ऋजुता लुकतुके

दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोची (Cristiano Ronaldo) लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. पठ्ठ्याने आपला खाजगी युट्यूब चॅनल सुरू केला. तर त्यालाही पहिल्या चार तासांतच लक्षावधी सबस्क्राईबर मिळाले आहेत आणि हा एक विक्रमच आहे. क्रिस्टियानोनं आपला पहिला व्हिडिओ बुधवारी शेअर केला. ४ तासांतच ५०,००,००० लोकांनी या चॅनलला पसंती दिली. रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनेलचे नाव ‘यूआर क्रिस्टियानो’ आहे. त्याचे चॅनल सर्वात वेगाने सबस्क्राईब मिळवणारे चॅनल बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) त्याच्या पहिल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये फुटबॉलपासून बाहेरच्या जगात आपला दिवस कसा घालवतो याची झलक दिली आहे. त्याने यूट्यूब चॅनेलबद्दल उत्साह व्यक्त केला आणि चाहत्यांशी अधिक चांगला समन्वय राखणे हा आपला उद्देश असल्याचे सांगितले. क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणाला की, मी नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत बॉन्डिंगचा आनंद लुटला आहे. आता माझे यूट्यूब चॅनल मला चाहत्यांशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडण्यात मदत करेल.

(हेही वाचा – Gauri Lankesh हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

क्रिस्टियानो रोनाल्डोचा यूट्यूब आणि डिजिटल विश्वातील प्रवेश हे एक धोरणात्मक पाऊल म्हणता येईल. त्याचे फॅन फॉलोइंग आश्चर्यकारक आहे आणि जगातील लाखो लोक त्याला फॉलो करतात. यूट्यूबच्या माध्यमातून क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) त्याच्या फुटबॉल कारकिर्दीशी संबंधित आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी लोकांसोबत शेअर करू शकेल. त्याचं चॅनल फुटबॉल विश्वातील सर्वाधिक सबस्क्राईब केलेले चॅनेल देखील बनू शकेल. रोनाल्डोला वैयक्तिक आधारावर त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधायचा आहे हा या वाहिनीचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असू शकतो.

रोनाल्डोने या २०० सामन्यांत १२३ गोल्स केले आहेत आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा मान त्याने पटकावला आहे. पोर्तुगालने युरो पात्रता स्पर्धेत सलग सहाव्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाची पाटी कोरी ठेवली आहे. मागच्या वर्षी रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) २०२५ पर्यंत अल नस्सरसोबत करार केला. यासाठी त्याला २०० मिलियन यूरो म्हणजेच १,७७५ कोटी रुपये मिळणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.