मविआला दलित मुस्लिमांची मते मिळणार नाहीत; Raj Thackeray असे का म्हणाले?

258
मविआला दलित मुस्लिमांची मते मिळणार नाहीत; Raj Thackeray असे का म्हणाले?
मविआला दलित मुस्लिमांची मते मिळणार नाहीत; Raj Thackeray असे का म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बघून दलित, मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मतदान केलं नाही, तर नरेंद्र मोदींचा विरोध म्हणून कौल दिला आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत दोन्ही समाज महाविकास आघाडीला (MVA) मतदान करणार नाही, असे भाकित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी गडचिरोली (MNS Gadchiroli) येथे वर्तविले. (Raj Thackeray)

राज ठाकरे यांनी गुरुवारी (२२ ऑगस्ट) पक्ष निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी अनौपचारीक चर्चा केली. यावेळी पक्षाचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray), प्रवक्ते तथा नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kaale), सतनामसिंह गुलाटी, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्रीकांत माने (Shrikant Mane) उपस्थित होते.

(हेही वाचा – Zomato to Buy Paytm : झोमॅटो खरेदी करणार पेटीएमचा तिकीट विक्री व्यवसाय)

राज ठाकरे म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत कुणाला कौल मिळेल, हे आताच सांगता येणार नाही. सध्या विविध पक्षांमध्ये प्रचंड सरमिसळ झाल्याने मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. परंतु मनसे इतर पक्षातून आलेल्यांना थेट उमेदवारी देणार नाही. आधी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ. आम्ही विदर्भातील (MNS Vidarbh) बहुतांश जागा ताकदीने लढू,असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. (Raj Thackeray)

विदर्भातील मनसेमध्ये लवकरंच संघटनात्मक मोठे फेरबदल होतील. अनेक निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करुन, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, जेव्हा अमित निवडणूक लढेल तर गुपचूप लढणार नाही, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. गुन्हेगारांना कायद्याची भीतीच राहिली नाही. माझ्या हातात सत्ता दिल्यास पोलिसांना पूर्ण मोकळीक देईन, असे ठाकरे म्हणाले. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाढई, हरीश वलादे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – मला कधीही मंत्री बनायचे नव्हते; Suresh Gopi यांनी अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी)

गडचिरोलीत जंगी स्वागत

राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे गुरुवारी दुपारी गडचिरोली (MNS Raj Thackeray, Gadchiroli) शहरात आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल, ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. महिलांनी राज ठाकरे यांचे औक्षण केले. त्यानंतर सर्किट हाऊस येथे पारंपरिक आदिवासी नृत्याने राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी ठाकरे यांच्या आगमनानिमित्त मोठमोठे होर्डींग्ज आणि झेंडे लावण्यात आले होते. (Raj Thackeray)

हेही वाचा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.