महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. रणनिती आखली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ स्तरावर बैठका होत आहेत. घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhansabha Election) दिवाळीनंतरच होतील, असे बोलले जात आहे. राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील? कोणाला किती टक्के मतं मिळतील, याबाबतचा नवा सर्वे समोर आला आहे. इंडिया टुडे-सी व्होटर्सचा ‘मुड ऑफ नेशन’ सर्व्हे समोर आला आहे. (Mood Of Nation Survey)
(हेही वाचा –‘लाडकी बहीण योजना’ बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू; CM Eknath Shide यांची घोषणा)
इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या ‘मुड ऑफ नेशन’ सर्व्हेनुसार, मविआला (MVA) 150 ते 160 जागा मिळू शकतात. तर महायुती 120 ते 130 जागांवर मुसंडी मारु शकते, असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी पाहिली असता महायुतीला (Mahayuti) 42 टक्के मतं मिळू शकतात तर महाविकास आघाडीला 44 टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे. (Mood Of Nation Survey)
(हेही वाचा –शालेय परिसरात मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंधासाठी शासन व समाजाच्या सहभागाची आवश्यकता; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांची सूचना )
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 43.71 टक्के मतं मिळवली होती, तर महायुतीला 43.55 टक्के मतं मिळवण्यात यश आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीला यश मिळेल, असाच सर्व्हेचा अंदाज आहे. शिवाय, मविआला 150 ते 160 जागा आल्यास मविआची महाराष्ट्रात सत्ता देखील येऊ शकते. याशिवाय या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 3.1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. (Mood Of Nation Survey)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community