Maharashtra Band: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद; ‘या’ सेवांवर दिसू शकतो परिणाम,

606
Maharashtra Band: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद; 'या' सेवांवर दिसू शकतो परिणाम,
Maharashtra Band: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद; 'या' सेवांवर दिसू शकतो परिणाम,

बदलापुरातील (Badlapur Sexual Abuse Case) शाळेत (Adarsh ​​Vidya Mandir) शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपी अटक केली होती. आता आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दम्यान, महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे.

अनेक सेवांवर परिणाम
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे. उबाठा गट, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक सेवांवर त्यांचा परिणाम दिसून येईल. प्रवाशांना या बंदचा फटका बसू शकतो. (Maharashtra Band)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री दोन तास बैठक
दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री दोन तास बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. (Maharashtra Band)

बाजारपेठा बंद
राज्यातील एसटी महामंडळ आणि रेल्वे सेवेवर या बंदचा परिणाम दिसू शकतो. मुंबईत लोकल सेवेवर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी बंद दरम्यान एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने नुकसान झाले होते. तर बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता. खबरदारी म्हणून या सेवांना राज्यात काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. हा राजकीय बंद नसल्याचे अगोदरच महाविकास आघाडीने स्पष्ट केले आहे. उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. भाजीपाला मार्केट, इतर दुकाने बंद असतील. दूध विक्री, भाजीपाला विक्री आणि किराणा सामानाची दुकानं, हॉटेल्स बंद राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Band)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.