Shiv Sena UBT ची मुख्यमंत्री पदावरून चिडचीड उघड

182
Shiv Sena UBT ची मुख्यमंत्री पदावरून चिडचीड उघड
Shiv Sena UBT ची मुख्यमंत्री पदावरून चिडचीड उघड

मुख्यमंत्री पदासाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून सकारात्मक पाठींबा मिळत नसल्याने नाराज झालेल्या शिवसेना उबाठाची आता चिडचीड होऊ लागली आहे. आज शुक्रवारी २३ ऑगस्टला पत्रकार परिषदेत उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बोलण्यात ही चिडचीड उघड झाली. (Shiv Sena UBT)

ठाकरे स्वतःविषयी कुठे बोलले?

राऊत यांच्या पत्रकार परिषदेत एकाने प्रश्न केला की, उद्धव ठाकरे हे कॉँग्रेसकडे मुख्यमंत्री पदासाठी याचना करीत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपावर आरोप केले तसे ठाकरे आता शरद पवार यांच्यावर आरोप करतील असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. या प्रश्नावर राऊत यांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले आणि त्यांनी बावनकुळे यांच्यावरच आरोप केले. “बावनकुळे ही राजकारणातील वाया गेलेली केस आहे. आम्हाला कुणाचीही याचना करण्याची गरज नाही. आम्ही महाविकास आघाडीची एक भूमिका मांडली की मुख्यमंत्री पदाचा चेहेरा समोर आणला पाहिजे. तो चेहेरा कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीने द्यावा, ठाकरे स्वतःविषयी कुठे बोलले?” असा सवालच राऊत यांनी उपस्थित केला. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा- National Space Day: भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस! जाणून घ्या इतिहास…)

आघाडीतील पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो

‘ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री’ हे धोरण कोंगेसचे आहे, या धोरणाला ठाकरे यांचा विरोध असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. “ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे धोरण कधीच यशस्वी होत नाही कारण आघाडीतील प्रत्येक पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो,” असे राऊत म्हणाले. (Shiv Sena UBT)

असं कोणी सांगितलं?

कॉँग्रेसमध्ये या मुद्द्यावर नाराजी आहे आणि कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले की सध्या मुख्यमंत्री पदाची चर्चा आम्हाला नको आहे, असे पुढे एका पत्रकाराने सांगताच राऊत यांनी “असं कोणी सांगितलं?” असा तीन वेळा प्रतिप्रश्न करत संबंधित पत्रकाराला प्रश्नही पूर्ण करण्यात अडथळे आणले. “बरं.. बोलूद्या ना त्यांना.. नाना पटोले पटोले हे ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी बोलले नाहीत. आणि सगळ्यांना मान्य आहे की चेहेरा असल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला सामोरे जाता येत नाही. पण सध्या या राज्यात विषय आहे तो मुली, महिलांवर अत्याचार होत आहेत,” असे उत्तर राऊत देत मूळ प्रश्नाला बगल दिली. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा- Vidhansabha Election 2024 : नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांविरोधात अनिल देशमुख निवडणूक लढवणार का?)

मुख्यमंत्री पदासाठी अट्टाहास कायम

ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात मुख्यमंत्री पदाचा विषय काढून आघाडीत काडी टाकली असल्याची भावना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये व्यक्त होत आहे. तर लोकसभेचा विचार करता ठाकरे यांना आघाडीत जास्त जागा जिंकता येतील यांची खात्री नसल्याने अप्रत्यक्षरित्या आपलेच नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्याचा अट्टाहास धरला आहे, असेही बोलले जाते. (Shiv Sena UBT)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.