- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकातील विजेतेपदानंतर भारतीय संघासमोर पुढील आव्हान आहे ते पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा (Champions Trophy 2025) आणि त्यानंतर होणारी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा. भारतीय संघाची पुनर्बांधणी या दोन स्पर्धा गृहित धरूनच होत आहे. आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असल्याने तिथे भारतीय संघ खेळणार का हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अशावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याविषयी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. टी२० विश्वचषकापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्मा बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवणार असल्याचे भाकीत केले होते. आता जय शाह यांनी चॅम्पियन्स करंडक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्र बंदला Gunaratna Sadavarte यांचं उच्च न्यायालयात आव्हान)
भारतीय संघ पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत तिरंगा फडकावेल, असं जय शाह यांनी यावेळी म्हटलं आहे. जर आम्हाला १.४ अब्ज लोकांचा आशीर्वाद असेल तर आम्ही चॅम्पियन्स करंडक आणि कसोटी अजिंक्यपदही जिंकू, असं जय शाह यांनी सांगितलं. सियाट पुरस्कार सोहळ्यानंतर बोलताना जय शाह म्हणाले, “जसे मी राजकोटमध्ये सांगितले की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवेल, तसंच मी म्हणतो की १.४ अब्ज लोकांचा आशीर्वाद मिळाल्यास चॅम्पियन्स करंडक आणि अजिंक्यपद स्पर्धेतही असेच करू… (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – National Space Day: भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस! जाणून घ्या इतिहास…)
यंदाची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होत आहे. त्यामुळे भारतीय संघ (team India) पाकिस्तानला जाणार का असाही प्रश्न आहे. पण, यावर जय शाह यांनी नेमकं उत्तर दिलं नसलं, तरी काय होईल ते तुम्हाला कळेलच, असं सूचक बोलले आहेत. आतापर्यंत पाकिस्तानला संघ पाठवायचा असेल तर त्यासाठी केंद्रसरकारीच परवानगी लागते आणि ती मिळवणं कठीण आहे, असंच बीसीसीआय सांगत आलं आहे. आशिया चषकावेळी भारताची त्रयस्थ ठिकाणी सामने खेळवण्याची विनंती मान्य करण्यात आली होती. यावेळी मात्र पाकिस्तान क्रिकेट मंडळ (PCB) संपूर्ण स्पर्धा पाकमध्येच भरवण्यावर ठाम आहे. तर भारताने अजून पाकिस्तानमध्ये खेळण्याची तयारी दर्शवलेली नाही. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community