Rohit Sharma : रोहित शर्मा, जय शाह यांनी टी-२० विश्वचषक ठेवला सिद्धिविनायकाच्या चरणी

Rohit Sharma : भारताच्या ऐतिहासिक टी-२० विजयानंतर रोहित शर्मा, जय शाह सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते.

126
Rohit Sharma : रोहित शर्मा, जय शाह यांनी टी-२० विश्वचषक ठेवला सिद्धिविनायकाच्या चरणी
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने जून महिन्यात टी-२० विश्वचषक जिंकून आयसीसी विजेतेपदाचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवला. या विजेतेपदानंतर पहिल्यांदा विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अलीकडे मुंबईत प्रभादेवी इथं सिद्धिविनायक मंदिरात जाऊन हा चषक श्रीगणेशाच्या चरणी ठेवला. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यात टी-२० करंडकाला हार घालून त्याचं पूजन केलेलंही दिसत आहे.

(हेही वाचा – Nashik Congress च्या होर्डिंगवरुन एकमेव आमदाराचा फोटो गायब, कारण काय?)

२९ जून रोजी टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला आणि इतिहासात दुसऱ्यांदा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये विश्वविजेतेपद पटकावले. त्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीनेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दुसऱ्याच दिवशी रवींद्र जडेजानेही या फॉरमॅटला अलविदा केला.

(हेही वाचा – महाराष्ट्र बंदला Gunaratna Sadavarte यांचं उच्च न्यायालयात आव्हान)

आता भारतीय संघ (Team India) पुढील तयारीला लागला असून काही अवघड मोहिमा येत्या दिवसांत भारताला पार पाडायच्या आहेत. पुढील काही महिने भारतीय संघासाठी खूप व्यस्त असणार आहेत. सप्टेंबरमध्ये भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडशी तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. त्यानंतर भारताचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होईल. आणि २२ नोव्हेंबरपासून सुरू होणारी ५ कसोटींची मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.