Napal Bus Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात; १४ भारतीय ठार

229
Napal Bus Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात; १४ भारतीय ठार
Napal Bus Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात; १४ भारतीय ठार

नेपाळमध्ये ४० भारतीय प्रवासांना घेऊन जाणाऱ्या बसचे भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही बस नदीत कोसळ्याची माहिती मिळाली आहे असून, संबंधित बस ही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील आहे. ही बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती. नेपाळ पोलिसांनी (Nepal Police) ४० जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस तनहुन जिल्ह्यातील (Tanhun District, Nepal) मर्स्यांगडी नदीत (Marsyangdi River) पडल्याची माहिती दिली आहे. (Napal Bus Accident)

तनहुनचे डीएसपी दीपकुमार राय यांनी अशी माहिती दिली की, “यूपी  एफटी 7623 क्रमांकाची बस नदीत पडली असून, अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. ही बस गोरखपूरच्या केसरवाणी ट्रॅव्हल्सची असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात १४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता बघता मृतांच्या आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.   

(हेही वाचा –Shiv Sena UBT ची मुख्यमंत्री पदावरून चिडचीड उघड) 

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी

मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, यामुळे मदत आणि बचावकार्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसमध्ये ४० जण होते, त्यापैकी काहींना वाचवण्यात यश आले आहे. मात्र अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. तानाहुन जिल्ह्यात हा अपघात झाल्याचे नेपाळ पोलिसांनी सांगितले आहे. बस उत्तर प्रदेशची असून, हे सर्वजण उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यातून नेपाळला गेले होते, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

(हेही वाचा – cyber security course in hyderabad : हैदराबाद सायबर सिक्युरिटी कोर्सची फी किती आहे?) 

प्रवाशांची माहिती काढण्यास सुरूवात अपघातग्रस्त उत्तरप्रदेशातील असल्याचे समोर आल्यानंतर ही बस राज्यातील कोणत्या भागातून नेपाळला गेली होती त्याचा शोध घेतला जात असल्याचे उत्तर प्रदेशच्या आयुक्तांनी सांगितले आहे. (Napal Bus Accident)

हेही पाहा – 


 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.