Chief Secretary : चहल यांची मुख्य सचिव पदाच्या दिशेने वाटचाल

157
Chief Secretary : चहल यांची मुख्य सचिव पदाच्या दिशेने वाटचाल
  • सुजित महामुलकर

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आय. एस. चहल (Iqbal Singh Chahal) यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव गृह विभागात करण्यात आल्याने चहल यांची लवकरच राज्याच्या मुख्य सचिव पदी बढती होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर चहल यांच्यावर मुख्य सचिव पदाची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Chief Secretary)

(हेही वाचा – MVA च्या जागा वाटपात मुंबईत काँग्रेस, उबाठा तोट्यात; तर पवार गट ना नफ्यात ना तोट्यात)

मुख्य सचिवनंतर महत्त्वाचे पद

गुरुवारी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव चहल (Iqbal Singh Chahal) यांच्यावर गृह विभागाची जबाबदारी देण्यात आली. अपर मुख्य सचिव गृह हे पद मुख्य सचिव पदानंतर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याबाबत काढण्यात आलेल्या आदेशात ‘आपण आपला सध्याचा पदभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार सुजाता सौनिक यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा,’ असे म्हटले आहे. (Chief Secretary)

सौनिक यांची वर्णी निवडणूक आयुक्तपदी?

विद्यमान राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु. पी. एस. मदान हे ४ सप्टेंबर २०२४ रोजी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सौनिक यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे तर सौनिक यांच्या जागी मुख्य सचिव म्हणून चहल यांची वर्णी लागणार असल्याशी शक्यता एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना व्यक्त केली. (Chief Secretary)

(हेही वाचा – Vidhansabha Election 2024 : नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांविरोधात अनिल देशमुख निवडणूक लढवणार का?)

मदान यांची स्वेच्छानिवृत्ती, नंतर नियुक्ती

तत्कालीन मुख्य सचिव यु. पी. एस. मदान यांनी जेमतेम महिना-दीड महिन्यात म्हणजेच मे २०१९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. तसे वयोमानानुसार मदान हे ३१ ऑक्टोबर २०१९ ला निवृत्त होणार होते. निवृत्तीनंतर काही दिवसात त्यांची नियुक्ती राज्य निवडणूक आयुक्त म्हणून झाली. सुजाता सौनिक यांची मुख्य सचिव म्हणून १ जुलै २०२४ रोजी नियुक्ती झाली. सौनिक यांचा सेवा कार्यकाळ जून २०२५ पर्यंत असला तरी मदान यांच्याप्रमाणे त्या निवृत्ती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगण्यात येते. राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास पुढील पाच वर्षे त्या पदावर सेवेत राहू शकतात. (Chief Secretary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.